Join us

​पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हे आरती - द अननोन लव्हस्टोरी मधील गाणे आवडतंय प्रेक्षकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 13:38 IST

सगळ्यांनाच आता श्री गणेशाच्या आगमनाचे वेध लागले असून चित्रपटाच्या आणि अल्बमच्या माध्यमातून अनेक नवीन गाणी या उत्सवाच्या दरम्यान येत ...

सगळ्यांनाच आता श्री गणेशाच्या आगमनाचे वेध लागले असून चित्रपटाच्या आणि अल्बमच्या माध्यमातून अनेक नवीन गाणी या उत्सवाच्या दरम्यान येत असतात. गणेशोत्सवाच्या अगोदर गणपतीची आराधने करणारे एक भावस्पर्शी गीत आरती - द अननोन लव्हस्टोरी या आगामी चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केले आहे.पार्वतीच्या नंदना मोरया गजानना असे बोल असलेल्या या गीताला गायक आदर्श शिंदे यांनी गायलंय. सुजित यादव आणि तेजस बने यांनी हे गीत लिहिले आहे. गणपतीची आराधना करणारे हे गीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेत गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण अधिकच मंगलमय करेल असा विश्वास गायक आदर्श शिंदे यांनी व्यक्त केला. आरती - द अननोन लव्हस्टोरी या चित्रपटातील इतर गाणेही श्रवणीय झाली आहेत. सुजित यादव आणि तेजस बने यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतांना प्रशांत सातोसे आणि सजित-तेजस यांनी संगीत दिले आहे. पावसाळी मनी माझ्या पेटला काहूर का या गीताला गायक आदर्श शिंदे यांचा तर मन बावरे गीताला हरिहरन आणि दिपाली साठे यांचा स्वरसाज लाभला आहे. नन्ही सी परी हे अंगाईगीत आणि विठ्ठला हे भक्तीमय गीत प्रशांत सातोसे यांनी गायले आहे. सुजित यादव यांनी आम्ही जातो हे गीत गायले आहे. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेला आरती हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या दोघांसोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे आणि अनुष्का पाटील यांच्या भूमिका आहेत. Also Read : आरती या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अनोखी प्रेमकहाणी