Join us  

दोस्तीच्या धम्माल 'पार्टी'चा टीझर लाँँच,या तारखेला होणार प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:06 PM

सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.'फ्रेन्डशिप डे'च्या महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या 'पार्टी'त सहभागी होण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.

प्रत्येकांच्या आयुष्यात 'मित्र' हा असतोच! सुख-दुखांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी 'पार्टी' सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच टीझर लाँँच करण्यात आला. 

'पार्टी' च्या टीझरवर  सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या मराठीतील प्रसिद्ध युवाकलाकारांची झलक आपल्याला पाहायला मिळते. सहाजणांची रंजक गोष्ट आणि त्यांचे गमतीशीर किस्से या टीझरमध्ये आपल्याला दिसून येतात.या सिनेमाच्या टीझरवरून हा सिनेमा धम्माल विनोदी चित्रपट असल्याची जाणीव होते. प्रत्येक नाक्यानाक्यावर आढळणाऱ्या ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.'फ्रेन्डशिप डे'च्या महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या 'पार्टी'त सहभागी होण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.

मैत्रीचा हँँगओव्हर चढवणारा सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या 'पार्टी'चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला. धम्माल 'पार्टी'चा फील येत असलेल्या, या सिनेमाच्या कलरफुल पोस्टरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला हे मराठीतील प्रसिद्ध युवाकलाकार आपल्याला दिसून येतात. या सिनेमाच्या नावातच 'पार्टी' असल्यामुळे, सहाजणांच्या हटके मैत्रीवर हा सिनेमा आधारित असल्याचा अंदाज येतो. ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री घेऊन येत असलेली ही 'पार्टी' खास मैत्रीच्या महिन्यात आयोजित केली असल्यामुळे, प्रेक्षकांसाठी हा सिनेमा फ्रेन्डशिप डेची सरप्राईज 'पार्टी'च ठरणार आहे, हे नक्की.