Join us

"पहिलीच वारी जणू जन्मास उभारी...", विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्या छाया कदम, शेअर केला सुखद अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:00 IST

वारकऱ्यांसह फुगडी अन् ...; पंढरपूरच्या वारीत पहिल्यांदा सहभागी झाल्या छाया कदम, शेअर केला व्हिडीओ 

Chhaya Kadam: पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. गेली साडेसातशेहून जास्त वर्षे ' वारी ' अव्याहतपणे सुरू आहे. सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. वारीत सहभागी होऊन विठ्ठल भक्तीत रममाण होण्याचा मानस अनेकांचा असतो. या वारीमध्ये अनेक विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सर्वसामान्यांसह मनोरंजनविश्वातील काही कलाकार मंडळी देखील सहभागी झाले आहेत. अशातच मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी (Chhaya Kadam) नुकताच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत वारीचा सुखद अनुभव शेअर केला आहे. 

दरम्यान, यंदाच्या वारीमध्ये अभिनेत्री छाया कदम पहिल्यांदाच सहभागी झाल्या आहेत. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी पंढरपूर वारीचा खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. "पहिलीच वारी जणू जन्मास उभारी." विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल...; याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा...", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. 

छाया कदम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या विठ्ठल भक्तीत रममाण झाल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी अश्वाचं दर्शन सुद्धा घेतलं आहे. या वारीमध्ये छाया कदम यांच्यासह मराठी अभिनेत्री पायल जाधव देखील सहभागी झाली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर मराठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

टॅग्स :पंढरपूर वारीमराठीसेलिब्रिटीसोशल मीडिया