Join us

पल्लवीच्या अदांवर फॅन्स झाले फिदा, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 10:50 IST

पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे.

पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. आजवर अनेक मराठी, हिंदी मालिका, मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देखील तिने तिचा ठसा उमटवला आहे. तेलगू, तामीळ, मल्याळम, कन्नड अशा विविध भाषेच्या मालिकांमध्ये ती काम करते. एवढेच नव्हे तर तिने श्रीलंकेच्या मालिकेत देखील काम केले आहे. 

पल्लवी  सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच पल्लवीने एक तिचा इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटो पल्लवी खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या फॅन्सना ही तिचा हा लूक आवडला आहे. 

'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

पल्लवीने साऊथ चित्रपटसृष्टीत देखील काम केले असून तेलुगू भाषेतील एका सिनेमातही ती झळकली आहे. आयुष्मान खुरानाचा 'विकी डोनर' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये पल्लवीने प्रमुख भूमिका साकारली होती.  

टॅग्स :पल्लवी सुभाष