Join us

समीधाची झक्कास पैठणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 15:50 IST

सध्या संपूर्ण शहरात गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती या उत्साहावात भक्तीमय झाला आहे. त्याचप्रमाणे ...

सध्या संपूर्ण शहरात गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक व्यक्ती या उत्साहावात भक्तीमय झाला आहे. त्याचप्रमाणे  या भक्तीमय उत्साहात मुली म्हटल्या की, त्या अधिक भाव खाऊन जातात. नेहमी जीन्स, शॉर्टस, टॉपमध्ये दिसणाºया मुली अचानक आॅफीस, महाविदयालयात पारंपारिक लूकमध्ये दिसतात. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री समीधा गुरूचे देखील अशाच पारंपारिक लूकमधील काही फोटो सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. तसेच तिने आय लव्ह महाराष्ट्रीयन लूक असे स्टेटसदेखील अपडेट केले आहे. पण समीधा या फोटोमध्ये झक्कास पैठणीमध्ये दिसत आहे. तसेच नाकातील नथमुळे तिचे सौदर्य अधिक खुलून दिसत आहे. तिचा हा पारंपारिक लूक तिच्या घरातील गणपती पूजेचे दिसत आहे. तिचा हा पारंपारिक  लूक चाहत्यांच्या ही  पसंतीस नक्कीच पडेल.