Join us

पुन्हा एकदा 'के दिलं अभी भरा नहीं' रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 12:52 IST

उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं 'के दिलं अभी भरा नही' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज ...

उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं 'के दिलं अभी भरा नही' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज झालंय. विक्रम गोखले आणि रिमा यांनी एकेकाळी गाजवलेले हे नाटक आता नव्या रंगाढंगात नाटयरसिकांना पाहता येणार आहे. ''गोष्ट तशी गमती''ची मधील गमतीदार दांपत्य मंगेश कदम आणि लीना भागवत पुन्हा एकदा आपणास 'के दिलं अभी भरा नही ' मधून रसिकांचे  मनोरंजन करताना दिसणार आहेत. यापूर्वी रिमा आणि विक्रम गोखले या जोडगोळीला एकत्र आणणाऱ्या या नाटकाला रसिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. मात्र विक्रम गोखले यांच्या आजारपणामुळे हे नाटक मधेच थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे हे नाटक पाहण्यासाठी नाट्यरसिकांनाच  'दिलं अभी भरा नही' असे म्हणावे लागले. अखेर, प्रॉडक्शनचे  निर्माते गोपाळ अलगेरी यांनी हे नाटक पुन्हा नव्याने रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.