Join us  

प्रपोज करायची अनोखी स्टाइल; 'गडबड घोटाळा' मधील सविता प्रभुणे अन् अशोक सराफ यांचा 'हा' सीन आठवतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 5:05 PM

Gadbad Ghotala: बॉलिवूड असो वा मराठी प्रत्येक चित्रपटात एक तर लव्हस्टोरी असल्याचं पाहायलाच मिळतं. अशीच लव्हस्टोरी 'गडबड गोंधळ' या चित्रपटातही पाहायला मिळाली.

८०-९० चा काळ गाजवणारे असे असंख्य कलाकार आहेत ज्यांनी केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. सहज-साधे संवाद, प्रेक्षकांना आपलंसं करणारा अभिनय आणि प्रत्येकाचं लक्ष शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं कथानक या जोरावर ८०-९० च्या काळात अनेक चित्रपट गाजले. यातलाच एक चित्रपट म्हणजे 'गडबड गोंधळ'(Gadbad Ghotala). अभिनेता अशोक सराफ (ashok saraf), सविता प्रभूणे (savita prabhune), लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde), प्रेमा किरण (prema kiran), निळू फुले (nilu fule) अशी दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट सजला. विशेष म्हणजे या चित्रपटाची लोकप्रियता आजही तसूभरदेखील कमी झालेली नाही. त्यामुळेच आजही अनेक प्रेक्षक चित्रपटातील काही विनोदी संवाद, सीन आठवून खळखळून हसत असतात. असाच या चित्रपटातील एक भन्नाट सीनविषयी जाणून घेऊयात.

बॉलिवूड असो वा मराठी प्रत्येक चित्रपटात एक तर लव्हस्टोरी असल्याचं पाहायलाच मिळतं. अशीच लव्हस्टोरी 'गडबड गोंधळ' या चित्रपटातही पाहायला मिळाली. हेमू म्हणजे हेमंत ढोले( अशोक सराफ) आणि मनिषा (सविता प्रभूणे) यांची लव्हस्टोरी. विशेष म्हणजे या चित्रपटातील हेमू आणि मनिषा यांच्या लव्हस्टोरीचा एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ, सविता प्रभूणे यांना प्रपोज करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ झी टॉकीजने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हेमू, मनिषाला हटके अंदाजात प्रपोज करत आहे. विशेष म्हणजे तो कोळशाच्या वखारीत काम करत असल्यामुळे मनिषाला कोळशाशी संबंधित वस्तूंची उपमा देऊनच प्रपोज करतो. 

दरम्यान, सध्या या चित्रपटातील हा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जुन्या चित्रपटातील आठवणी पाहून अनेक जण आनंदीत झाले आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे, स्मिता तळवलकर, मनोरमा वागळे, शरद तळवलकर, निळू फुले, प्रेमा किरण अशी दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीअशोक सराफलक्ष्मीकांत बेर्डेसविता प्रभूणेनिळू फुले