Join us  

आता नेहा पेंडसेही अडकणार लग्नबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2016 12:37 PM

2016 या वर्षात अनेक कलाकारांनी विवाह केले असून या नामावळीत आता बहुदा नेहा पेंडसेही सामील होण्याची शक्यता आहे.सध्या नेहाची ...

2016 या वर्षात अनेक कलाकारांनी विवाह केले असून या नामावळीत आता बहुदा नेहा पेंडसेही सामील होण्याची शक्यता आहे.सध्या नेहाची आई तिच्यासाठी सुयोग्य वराचा शोध घेत असून पुढील वर्षी नेहाचे शुभमंगल व्हावे, अशी तिच्या आईची तीव्र इच्छा आहे. परंतु जीवनात काही वेगळेच घडण्याची शक्यता आहे, असे दिसते. नेहाची धाकटी बहीण मीना पेंडसे ही भविष्य बघते आणि ती अलीकडेच मालिकेच्या सेटवर आली होती. तिने सेटवरील काहीजणांचे भविष्यही सांगितले, परंतु आपली बहीण व अभिनेत्री नेहाच्या नशिबात विवाहयोग केवळ 2021 मध्येच आहे आणि तिचे लग्न हा ‘जुळविलेला प्रेमविवाह’ असेल, अशी भविष्यवाणी तिने यावेळी केलीय.नेहाकडे तिच्या बहिणीच्या या भविष्यकथनाबद्दल विचारणा केली असता ती म्हणाली, “हो, माझं लग्न करून टाकण्यासाठी माझे पालक उतावीळ झाले आहेत. पण मी त्याबद्दल अजून विचार केलेला नाही. माझ्या नशिबात काय आहे, ते कळेलच. जो मुलगा माझ्या कारकीर्दीच्या आड येणार नाही, त्याच्या मी शोधात आहे. आजकाल पुरुषांना धाडसी आणि ठाम मनाची मुलगी पत्नी म्हणून नको असते, असं माझं निरीक्षण असून त्यामुळे मला जीवनसाथी मिळण्यात थोडीशी अडचण येत असल्याचे नेहाने सांगितले आहे. तुर्तास नेहाला चांगला नवरामुलगा मिळावा यासाठी आपण तिला शुभेच्छा देऊयात, यंदा कर्तव्य म्हणत मराठी सिनेसृष्टीच्या आघाडीच्या अभिनेत्र लग्नबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले. मृण्यमयी देशपांडे व्यवसायिक स्वप्नील रावसह, , श्रृती मराठेचे अभिनेता गौरव घाटणेकरसह ,पल्लवी पाटीलचे अभिनेता संग्राम समेळस. आणि अभिनेता चिराग पाटील मॉडेल सना अंकोला नुकतेच लग्नबंधनात अडकत त्यांच्या आयुष्याशी नवी सुरूवात  केली. आता आणखी कोणते कलाकरा लग्नबंधनात अडकतायेत याची उत्सकुता सा-यांनाच लागली आहे. नवीन वर्षात मयुरी वाघ आणि पियुष रानडेसह, क्रांती रेडकर यांचे लग्नसोहळा परा पडेल त्याच यादीत नेहा पेंडसेलाही तिच्या मनासारखा जीवनसाथी मिळो, ही शुभेच्छा !