Join us  

"भाऊ तुम्ही अनिल कपूरला टक्कर देणारे एकमेव.." सुनील बर्वेंच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केली कमेंट, म्हणाले-आमच्यासाठी तुम्ही..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 4:06 PM

सुनील बर्वे यांचं नाव आजही मराठी कलाविश्वात आदराने घेतलं जातं.

मराठीतील अतिशय देखणे अभिनेते सुनील बर्वे यांचं नाव आजही मराठी कलाविश्वात आदराने घेतलं जातं. त्यांनी 'अफलातून' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. सुनील बर्वेंनी हिंदी, मराठी, गुजराती भाषांमध्ये चित्रपट, मालिका आणि नाटक अशा सर्वच क्षेत्रात उत्तम काम केलं आहे. आजही ते काम करुन थकले नाहीत तर सतत कामात व्यस्त असलेले बघायला मिळत आहेत. ३ ऑक्टोबरला सुनील बर्वे यांनी आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. 

सुनील बर्वे यांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतानाचे फोटो शेअर करत एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांची तुलना अनिल कपूर यांच्याशी केली आहे. 

सुनील बर्वे यांची पोस्ट परवा ३/१०/२०२३ रोजी माझा ५७ वा वाढदिवस झाला! अर्थातंच खूप आनंदात गेला! सर्व माध्यमांतून, प्रेम करणाऱ्या अनेकांनी शुभेच्छा संदेश पाठवले, काहींनी फोन करून तर काहींनी भेटवस्तू पाठवून, आणि काहींनी प्रत्यक्ष भेटून माझा वाढदिवस साजरा केला!! ह्या सर्वांसाठी परमेश्वराकडे कृपादृष्टीपर आशिर्वाद मागतो, आणि वैयक्तिक आभार मानतो!! ज्यांनी व्हॅाट्सॲप वर संदेश पाठवले त्या सर्वांना त्याच दिवसात उत्तरं द्यायची असं ठरवलं होतं पण आजचा दिवस उजाडलाच! आता आज इन्स्टा व फेसबुक ताब्यात घ्यायचं ठरंवलंय! पण हा ‘मिडिया’ इतका खोल आहे, की तळ गाठेनंच ह्याची खात्री नाहीए, तरी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणूनंच आगाऊ एक माफी मागुन ठेवतो, की मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जरी तुम्हाला उत्तर द्यायचं राहून गेलंच तरी कृपया राग धरू नका!!! (आज पर्यंत धरला नाहीएत तसाच आज आणि इथून पुढेही लोभ असू द्यावा)!!! बघता बघता ५७ झालो हो!! ह्या आकड्यांच्या जागेची सुद्धा आदलाबदल होईल ..बघता बघता, पण तुमचा स्नेह आणि शुभेच्छा अशाच माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी असू द्या!! वाढदिवसा निमित्त मिळालेल्या तुमच्या शुभेच्छांवर हे संपूर्ण वर्ष सुखात जाईल ह्या बद्दल शंकाच नाही! पुढल्या वाढदिवसा पर्यंत मी, तुम्हाला आवडेल असं काम करत राहीन, तुम्ही आनंद घेत रहा! पुन्हा एकदा *स ग ळ्यां चे* मनःपूर्वक आभार!!! धन्यवाद!!!

 

''५७ हा फक्त आकडा आहे.. अजूनही आमच्यासाठी तुम्ही चार्मिंग आहात'', ''भाऊ तुम्ही अनिल कपूर ला टक्कर देणारे एकमेव'', ''वाटतत नाही तुम्ही ५७ वर्षांचे'', ''सदैव तरुण दिसणारा अभिनेता'' अशा कमेंट्स त्यांच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :सुनील बर्वे