Join us  

नेहा महाजनचा हॉलिवूडपट आला प्रेक्षकांच्या भेटीला, मिळतोय चांगला रिस्पॉन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 12:25 PM

नेहाची नुकतीच वेबफिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.

मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. नेहाची नुकतीच वेबफिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेब फिल्मचे नाव आहे एक्स्ट्रॅक्शन. या वेबसीरिजमध्ये क्रिस हेम्सवर्थ, रणदीप हुडा आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. हा अॅक्शनपट आहे.

एक्स्ट्रॅक्शन या चित्रपटात नेहा महाजनने न्येसा नामक रणदीप हुडाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सीनचा फोटो नुकताच नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत म्हटले की, एक्स्ट्रॅक्शन चित्रपटातील आणखीन एका सीनमध्ये साजू आणि न्येसा.

यापूर्वी नेहाने या चित्रपटातील काही फोटो शेअर केले होते.

त्यातील एका फोटोत तिने सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे. तिने म्हटलं की, प्रत्येक सीनमधून खूप काही शिकायला मिळाले. खूप आठवणी, नाती आणि फिलिंग आहेत आणि आता जगासमोर हा सिनेमा आला आहे. तिने या पोस्टमध्ये सर्वांना टॅग करत त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे. नेहा ही फिटनेस फ्रिकही आहे. नित्यनियमाने ती योगा करत असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या फिटनेसच्या दिनचर्येकडे कधीच दुर्लक्ष करत नाही.

खरंतर नेहाने 'कॉफी आणि बरचं काही', 'वन वे तिकीट', 'निळकंठ मास्तर' असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत.नेहाने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

टॅग्स :नेहा महाजनरणदीप हुडा