Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य संमेलनाने घेतली Coronaची धास्ती; घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 12:20 IST

कोरोनाचा भारतात पहिला बळी गुरुवारी गेला आहे.

कोरोना व्हायरसने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाने संपूर्ण देशाला धडकी भरवली आहे. कोरोनाचा भारतात पहिला बळी गुरुवारी गेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः गर्दीचे ठिकाणांवर कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्यामुळे थिएटर, मॉल, मंदिरं अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेचे 100वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ कांबळीने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 25 मार्च रोजी होणारे नाट्य संमेलन आता 14 जून 2020 या कलावधीत होणार आहे. अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आली आहे. सुबोध भावेने देखील काही दिवसांपूर्वीच 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचा अमेरिकेतील दौरा रद्द केला होता. 

ऐवढेच नाही तर  बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमांच्या तारखांसह अपेक्षित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बॉलिवूडचा बिग बजेट सूर्यवंशीची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या