Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ गौरव-श्रृतीच्या वेडिंग पार्टीत नसिरुद्दीन शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 15:30 IST

गौरव घाटणेकर आणि श्रृती मराठे ही क्युट जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. श्रृती आणि गौरवच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ...

गौरव घाटणेकर आणि श्रृती मराठे ही क्युट जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. श्रृती आणि गौरवच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. श्रृतीच्या मेहंदी सोहळ््याला देखील तिच्या काही इंडस्ट्रीतील मैत्रीणींनी धमाल केली होती. नुकतीच या दोघांनीही चेंबुरला त्यांची वेडिंग पार्टी अरेंज केली होती. या पार्टीमध्ये त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थिती होती. परंतू या पार्टीत एका व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि ते म्हणजे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शहा. होय, नसिर सरांनी या दोघांच्याही वेडिंग पार्टीला चार चाँद लावले. नसिर सर त्यांच्या पत्नीसह या सोहळ््याला उपस्थित राहिले होते. गौरव नसिर सरांना त्याच्या गुरु स्थानी मानतो. आणि स्वत: आपले गुरु जर आपल्या अविस्मरणीय क्षणी आपल्या सोबत असतील तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. नसिरुद्दीन शहा यांनी वेडिंग पार्टीला हजेरी लावल्या नंतर असाच आनंद गौरवला झाला होता. श्रृती आणि गौरवची जोडी या पार्टी मध्ये खुपच सुंदर दिसत होती.  श्रुतीने यावेळी लाल रंगाचा क्रॉप स्कर्ट आणि टॉप परिधान केला होता. सुपर सेक्सी क्रॉप स्कर्ट म्हणून तिने तिच्या स्कर्टचे कौतुक केलेले सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. या नवीन नवरीच्या लूकला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच ही स्टाईल श्रद्धा ओझा यांची असल्याचेदेखील तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. श्रुती आणि गौरवची  एका चित्रपटाच्या माध्यमातून  मैत्री झाली आहे. त्यांच्या या मौत्रिचे रूपांतर प्रेमात झाले आहे. आता ही रिल लाईफ जोडी रियल लाईफमध्ये कायमचीच बंदीस्त झाली आहे.