Join us

'माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!', हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा

By तेजल गावडे | Updated: December 9, 2020 13:31 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या शेतकऱ्यांचे सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनीही समर्थन केले आहे. दरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.

 हेमंत ढोमेने ट्विट केले की, बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात! माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!

 अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तो त्याचे मत सोशल मीडियावर मांडत असतो. बऱ्याचदा त्यामुळे तो चर्चेत देखील येतो. यावेळी त्याने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आपले मत सोशल मीडियावर मांडले आहे. 

हेमंत ढोमेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच त्याची चंद्र आहे साक्षीला ही मालिका कलर्स मराठीवर दाखल झाली आहे. या मालिकेत त्याच्यासोबत सुबोध भावे, ऋतुजा बागवे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

तसेच नुकतेच त्याने लंडनमध्ये एका मराठी चित्रपटाचे शूटिंग केले. लोकेश विजय गुप्ते यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात हेमंतसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे. हेमंत ढोमे शेवटचा चोरीचा मामला या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :शेतकरी संपसोनाली कुलकर्णी