Join us

मुक्ता देणार कोडमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 14:20 IST

           मराठी इंडस्ट्रीतील व्हर्सटाईल अ‍ॅक्ट्रेस म्हणुन मुक्ता बर्वेने नेहमीच विविध भुमिका साकारुन हे बिरुद खरे ...

           मराठी इंडस्ट्रीतील व्हर्सटाईल अ‍ॅक्ट्रेस म्हणुन मुक्ता बर्वेने नेहमीच विविध भुमिका साकारुन हे बिरुद खरे करुन दाखविले आहे. आजवर अनेक चित्रपट, मालिका व नाटकांमध्ये नेहमीच मुक्ताने विविधांगी भुमिका साकारुन दर्जेदार अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. आता पहा ना अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मुक्ताचे नवीन नाटक कोडमंत्र येत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजला जाणारा अक्षयतृतीयेच्या शुभ दिनी या नाटकाचा मुहुर्त करण्यात आला. मुक्ताने पुजा करुन नाटकाच्या मुहूर्ताचा शुभारंभ केला. चांगल्या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात केली की त्याला यश हे नक्कीच मिळते असे समजले जाते. आता या नाटकाला प्रेक्षकांची किती पसंती मिळते हे लवकरच आपल्याला समजले . एप्रिल अन मे महिन्यात मराठी रंगमंचावर अनेक नाटके येत आहते. अशाच एका राजेश जोशी दिग्दर्शीत कोडमंत्र या नाटकात मुक्ता बर्वे, उमेश जगताप, अजय पुरकर, फैस खान हे कलाकार  मुख्य भुमिकांमध्ये दिसतील. कोडमंत्र हे नावच इंटरेस्टींग असुन या नावातील कोड हे अक्षर इंग्रजीत असुन मंत्र हा शब्द मराठी मध्ये आहे. लवकरच हे नाटक रंगमंचावर येत असुन नक्कीच प्रेक्षक मुक्ताचा अभिनय पाहण्यास उत्सुक असतील यात शंका नाही.