Join us  

आपला कोकण भारी असा! मुग्धाने शेअर केला प्रथमेशच्या आजोळचा फोटो; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 5:04 PM

काजूच्या बागेतला मुग्धा प्रथमेशचा फोटो

मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) सर्वात लाडकं कपल. त्यांच्या सुमधूर सुरांनी सर्वच प्रेक्षकांवर भुरळ पाडली. दोघांचं लग्न झालं तेव्हा अगदी जवळचं असल्यासारखंच सगळे खूश झाले. मुग्धा आणि प्रथमेश दोघंही कोकणातलेच. मुग्धा अलिबागची तर प्रथमेश रत्नागिरीचा. कोकणचं सौंदर्य ते त्यांच्या व्लॉगमधून दाखवत असतात. आता मुग्धाने प्रथमेशच्या आजोळचा एक फोटो शेअर केला आहे.

निसर्गरम्य सौंदर्यात एका ठिकाणी निवांत असा हा फोटो आहे. यामध्ये प्रथमेश, मुग्धासोबत आणखी कुटुंबातले इतर सदस्य आहेत. ही काजूची बाग आहे. मुग्धाने कॅप्शनमध्ये लिहिले,'प्रथमेशच्या आजोळी चाफेड ला गेलो होतो. मी पहिल्यांदा काजूची बाग बघितली. काजू पहिल्यांदाच गोळा केले, निवडले. जाम मजा आली. आपला कोकण भारी आसा!'

मुग्धा आणि प्रथमेशच्या पोस्ट कायमच लक्ष वेधून घेतात. याहीवेळी तिने काहीतरी नवीन माहिती शेअर केली आहे. चाहतेही त्यांनी शेअर केलेला कंटेंट एन्जॉय करतात. गाण्याव्यतिरिक्त दोघांना फिरण्याचीही आवड आहे. युट्यूब व्लॉग वरुन ते कोकणचं वैभव दाखवतात. त्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.  

टॅग्स :सा रे ग म पमराठी गाणीसंगीतसेलिब्रिटीकोकण