Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृण्मयी देशापांडेचे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ,SEE PHOTO

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 07:30 IST

नववारी साडी आणि नाकात नथ,हातात हिरव्या बांगड्या, केसांचा आंबडा आणि त्याभोवती मोगऱ्याचा गजरा, तसेच कपाळावर उठवदार कुंकू असा साज असलेला या लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेहमीच चाहते अभिनेत्रींचा हॉट अवतार पाहून घायाळ होतात असे चित्र पाहायला मिळतं.मात्र मृण्मयीचा हा  फोटो पाहून  चाहत्यांना घायाळ करण्यासाठी केवळ हॉट लूकच गरजेचा असतो असे नाही.आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच मृण्मयीच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.मृण्मयीने सोशल मीडियावर हा फोटो अपलोड करताच तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेसच हा फोटो शेअर करतेवेळी  फर्जंद पाहिला की नाही अजून? अशी विचारणादेखील तिने केली आहे.तुर्तास मृण्मयीचा  नववारी साडी आणि नाकात नथ,हातात हिरव्या बांगड्या, केसांचा आंबडा आणि त्याभोवती मोगऱ्याचा गजरा, तसेच कपाळावर उठवदार कुंकू असा साज असलेला  या लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. मृण्मयीने फर्जंद केसर नावाच्या एका कलावंतीणीची भूमिका साकारली  होती.या सिनेमासाठी मृण्मयीने १५ दिवस दररोज चार तास तलवारबाजीचा सराव केला. सिनेमाच्या माध्यमातून तिचा लढवय्या बाणा रसिकांना पाहायला मिळाला.रसिकांनी मृण्मयीच्या या भूमिकेचे खूप कौतुक केले.आता मृण्मयी सिनेमा दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरु करत आहे. 'के सरा सरा' या सिनेमापासून मृण्मयी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे. मृण्मयीकडे ३ ते ४ स्क्रीप्ट्स होत्या. गेल्या ४ वर्षांपासून ती यावर विचार करत होती. काही तरी आव्हानात्मक आणि वेगळे करण्याच्या विचारातून अखेर तिने 'के सरा सरा' या सिनेमाच्या कथेची निवड दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी केली. या सिनेमाची कथा नातेसंबंधांवर आधारित असणार आहे.