Join us  

मृण्मयी देशपांडेच्या नो मेकअप लूकची रंगलीय सगळीकडे चर्चा, मेकअपशिवायही दिसते खूपच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 2:44 PM

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिचा मेकअपशिवायचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत ती खूपच छान दिसत आहे. 

ठळक मुद्देमृण्मयीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आठ हजाराहून अधिक लाईक या फोटोला मिळाले आहेत.

अभिनेत्री आपण चांगल्या दिसाव्या यासाठी मोठ्या प्रमाणावर मेकअप करतात. पण काही अभिनेत्री या मेकअपशिवाय देखील खूपच सुंदर दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिचा मेकअपशिवायचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत ती खूपच छान दिसत आहे. 

मृण्मयी देशपांडेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकतेच तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो आहे.

मृण्मयीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आठ हजाराहून अधिक लाईक या फोटोला मिळाले आहेत. मृण्मयीने झोपेतून उठल्यानंतर फोटो शेअर केला असून या फोटोत ती मेकअपशिवाय दिसत आहे. तू मेकअपशिवाय देखील खूपच छान दिसते असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यांसारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे. मृण्यमयीने फर्जंद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.

मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ चित्रपटातही दिसली होती. या सिनेमाच्या माध्यमातून मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे