Join us
Daily Top 2Weekly Top 5

हीच सून असावी अशी होती मृण्यीच्या सासऱ्यांची इच्छा, अशी आहे मृण्मयी देशपांडेच्या लग्नाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 13:28 IST

मृण्मयीचा आज वाढदिवस असून तिने उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

ठळक मुद्दे3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती.

कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडेने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. मृण्मयीचा आज वाढदिवस असून तिच्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वोत्तम आणि अनुरुप जोडी समजली जाते. दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात शिवाय दोघांचं एकमेकांशी चांगलंच पटतं. मराठी चित्रपटसृष्टीतील ही जोडी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. 

3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल रावसह मृण्मयी रेशीमगाठीत अडकली होती. मृण्मयी-स्वप्नीलचे अरेंज्ड मॅरेज झाले आहे. मृण्मयी स्वप्निलच्या वडिलांची पहिली पसंती होती. स्वप्नातील सून मिळाली असे सांगत त्यांनी स्वप्निलला तिला भेटण्यास सांगितले होते. मृण्मयी सून म्हणून त्यांच्या घरात यावी यासाठी स्वप्निलचे वडील फारच उत्सुक होते. ती फारच सुंदर आहे, ती फार चांगल्या कुटुंबातील आहे तू तिला एकदा भेटायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले.

स्वप्निलनेही एकदा भेटायला काय हरकत आहे असा विचार करत होकार दिला आणि त्यांनी एकमेंकांचे नंबर घेतले आणि एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली. काही दिवस फोनवर बोलल्यानंतर स्वप्निल आणि मृण्मयी यांनी भेटायचे ठरवले. भेटल्यानंतर दोघांच्याही आवडी-निवडी जुळल्या आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडे