Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेहंदी रंगली गं! गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात मृण्मयीची धमाल; व्हिडीओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 13:20 IST

नुकतेच गौतमीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईते वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ एक लोकप्रिय जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या जात आहेत. आता गौतमी देशपांडे ही लोकप्रिय अभिनेत्रीसुद्धा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. सध्या गौतमीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात झाली आहे. नुकतेच गौतमीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले. बहिणीच्या मेहंदीत मृण्मयीने जबरदस्त धमाल केली असून तिचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे. 

गौतमीचा मेहंदी सोहळा हसत-खेळत पार पडल्याचं दिसून आलं. मेहंदी सोहळ्यात तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने जबरदस्त धमाल केली. मृण्मयी ही खणाची परकर चोळीत अतिशय सुंदर दिसत होती.  ‘के२ फॅशन क्लोसेट’ या इन्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मृण्मयी गौतमी सोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तर यावेळी होणारी नवरी अर्थात गौतमी गुलाबी रंगाच्या लेहेंगामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. 

गौतमी देशपांडे  २५ डिसेंबर रोजी स्वानंद तेंडुलकरबरोबर बोहल्यावर चढणार आहे. स्वानंद तेंडुलकर हा मराठीमधलं डिजिटल चॅनेल ‘भाडिपा’चा बिझनेस हेड आहे.  गौतमी आणि स्वानंदचं ठरतंय ही शंका याआधीही चाहत्यांना होतीच. कारण त्यांचे मध्यंतरी एका लग्नातील फोटो व्हायरल झाले होते. स्वानंद आणि गौतमीचं नक्की कसं जुळलं याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मात्र या जोडीवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडे सेलिब्रिटीमराठी अभिनेता