Join us

मृण्मयी आणि गश्मिर महाजनी एकत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 19:54 IST

 मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व हॅण्डसम अभिनेता गश्मिर महाजनी ही सुंदर व हटके जोडी लवकरच रूबीक्स क्यूब ...

 मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व हॅण्डसम अभिनेता गश्मिर महाजनी ही सुंदर व हटके जोडी लवकरच रूबीक्स क्यूब या चित्रपटात एकत्रित पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट असल्याचे मृणमयी देशपांडे हिने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना म्हणाली, या चित्रपटात एक छान लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. असो पण या चित्रपटाच्या निमित्ताने मृण्मयी व गश्मिर ही हटकी जोडी आॅन स्क्रीन रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. या जोडीचा हा आॅनस्क्रीन रोमान्स पाहण्यासाठी आणखी काही दिवस अजून वाट पाहूयात.