Join us

मिथिला पालकरने पहिल्यांदाच शेअर केला कुटुंबियांसोबतचा फोटो, क्षणात झाला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:15 IST

पहिल्यांदाच मिथिलाने तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ठळक मुद्देमिथिलाने तिच्या आई-बाबा आणि बहिणीसोबतचा फोटो पोस्ट केला असून माझ्या पालकांच्या फोटोबद्दल मला अनेकांनी विचारले होते. त्यामुळे हा फोटो पोस्ट करत आहे असे म्हटले आहे.

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. 

मिथिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण तिच्या सोशल मीडियाला तिच्या आई-वडिलांचा फोटो तिच्या फॅन्सना पाहायला मिळाला नव्हता. पण आता पहिल्यांदाच मिथिलाने तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मिथिलाने तिच्या आई-बाबा आणि बहिणीसोबतचा फोटो पोस्ट केला असून माझ्या पालकांच्या फोटोबद्दल मला अनेकांनी विचारले होते. त्यामुळे हा फोटो पोस्ट करत आहे असे म्हटले आहे. या फोटोला केवळ 23 तासांत 1 लाख 92 हजार लाईक्स मिळाले असून हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

कपच्या तालावरील मिथिलाचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथिलाने दाखवून दिली आहे. मिथिला नुकतीच रेणूका शहाणेच्या त्रिभंगा या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते.

टॅग्स :मिथिला पालकर