Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने नवऱ्याला खुल्लमखुल्ला सर्वांसमोर केली किस, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 19:01 IST

नेहा पेंडसेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती भाभीजी घर पर है या मालिकेत काम करते आहे. ती या मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारते आहे. नुकताच नेहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत ती तिचा नवरा शार्दुल सिंग ब्याससोबत रोमान्स करताना दिसते आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती पतीसोबत रेस्टॉरंटमध्ये खुल्लमखुल्ला किस करताना दिसते आहे. या व्हिडिओत ते दोघेही रोमँटिक अंदाजात दिसते आहे. व्हिडिओ शेअर करत नेहाने पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. कमेंटमध्ये एका युजरने विचारले की, तुझे लग्न कधी झाले? तर काही युजर्संनी तर विभूती भैय्याकडे तक्रार करेल अशी कमेन्ट केली आहे. नेहा सध्या तिच्या या व्हिडिओमुळे खूप चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री नेहा पेंडसे शेवटची जून चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी तिने आगामी चित्रपट रावसाहेबची घोषणा केली होती. या चित्रपटाची निर्मिती नेहाने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
टॅग्स :नेहा पेंडसे