Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी ही अभिनेत्री गेल्या २ दिवसांपासून आहे आजारी, म्हणाली-सगळ्यांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:08 IST

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत जे आता चिंतेचे कारण बनत चालले आहे. सेलिब्रिटीही कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे.

जगभरात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत जे आता चिंतेचे कारण बनत चालले आहे. सेलिब्रिटीही कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि संसदेच्या सदस्य किरण खेर (Kirron Kher) कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर आता एक मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावरून सर्वांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. चाहत्यांना अभिनेत्रीची चिंता सतावू लागली आहे.

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. पूजा सोशल मीडियावर तिचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतीच पूजानं एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये पूजा औषध खाताना दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिची आई तिला काढा देताना दिसत आहे.

मराठी कलाविश्वातील लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत ( Pooja Sawant). वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण करणारी पूजा आज प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पूजा सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. पूजा सोशल मीडियावर तिचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. पूजाने तिच्या इन्स्टावर स्टोरी शेअर केली आहे. 

यात पहिल्या पोस्टमध्ये पूजाने तिला दोन दिवसांपासून ताप आणि वायरल इन्फेक्शन झाल्याचं सांगत सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये पूजा औषध घेताना दिसत आहे. तर तिसऱ्या पोस्टमध्ये तिची आई तिला काढा देताना दिसत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजा सावंतचा हा फोटो आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

टॅग्स :पूजा सावंत