Join us
Daily Top 2Weekly Top 5

'८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांसमोर येणार संस्कृती-शुभंकरची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:35 IST

Teaser: हा सिनेमा येत्या १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही काळात मराठी सिनेविश्वात अनेक दर्जेदार आणि नव्या धाटणीच्या सिनेमांची निर्मिती होत आहे. यामध्ये संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे यांची मुख्य भूमिका असलेला ८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सुश्रुत भागवत दिग्दर्शित ८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी'च्या टीझरमध्ये सिनेमाची थोडक्यात झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमातून एक प्रेमकथा उलगडली जाणार असल्याचं दिसून येतं. या सिनेमाची निर्मिती उदाहरणार्थ या प्रोडक्शनअंतर्गत करण्यात आली आहे. तसंच विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.

दरम्यान, या सिनेमामध्ये शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री अशी तगडी स्टारकास्ट झळकली आहे. हा सिनेमा नव्या वर्षात म्हणजेच १९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सिनेमासंस्कृती बालगुडेमराठी अभिनेतासेलिब्रिटी