Join us
Daily Top 2Weekly Top 5

उषा नाडकर्णींना हिंदुजा हॉस्पिटलच्या वाटेवर आलेला स्वामी भक्तीचा चमत्कारिक अनुभव! म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:30 IST

"बहिणीचा नवरा हॉस्पिटलमध्ये होता आणि...", उषा नाडकर्णी सांगितला स्वामी भक्तीचा अनोखा अनुभव 

Usha Nadkarni: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं नाव सिनेसृष्टीत मोठ्या आदराने घेतलं जातं. त्यांनी आपल्या अभिनय कारकि‍र्दीत खूप काम केलंय. उषा नाडकर्णी यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.उषा यांची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे. नुकतंच  एका मुलाखतीत उषा नाडकर्णी स्वामी समर्थांच्या प्रचिती विषयी बोलल्या. 

अलिकडेच उषा नाडकर्णींनी 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांना आलेल्या स्वामी भक्तीच्या अनुभवाबद्दल उषा यांनी सांगितलं.  त्या म्हणाल्या,"माझ्या बहिणीचा नवरा हॉस्पिटलमध्ये होता. तेव्हा माझी भाची म्हणाली, कारण तिच्याबरोबर कोणी नाही. माझी बहिण गेलेली वडील  हॉस्पिटलमध्ये असताना तिच्यासोबत कोणी नाही.कोणतरी सोबत पाहिजे म्हणून मी तिकडे गेलेले. तेव्हा तिच्या कपाटाचा खण साफ करताना त्यामध्ये स्वामींची मुर्ती मला तिथे मिळाली. ती मूर्तीस खणामध्ये पाहून मला वाईट वाटलं.ती मुर्ती मी बाहेर काढली, धुतली पुसली आणि अष्टगंध लावून पूजा केली आणि देव्हाऱ्यात ठेवली. माझी भाची केटरिंग कॉलेज आहे तिथे मुलांना शिकवते प्रोफेसर आहे."

काय घडलेलंं?

त्यानंतर उषा नाडकर्णींनी म्हटलं, "हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी टॅक्सीसाठी समोरच्या फुटपाथला उभी राहिले. तिथे उबरवाला उगाच कशाला येईल किधर जाने का है?असं विचारायला. तो मला म्हणाला, कुठे जायचं आहे मी सांगितलं हिंदुजा हॉस्पिटल किती पैसे घेणार पण तो पैसे घ्यायला तयार नव्हता. तसंच तिथून मी हिंदुजाला गेले. तिथून ह़ॉस्पिटलला जायला ३० रुपये होतात आणि तिथे गेल्यानंतर १०० रुपये दिले आणि तो गेला. पण उबरवाला ऐनवेळी कशाला येईल असं मला वाटलं. असा स्वामी प्रचितीचा किस्सा त्यांनी सांगितला.

मग त्या म्हणाल्या, "इतकंच नाही अलिकडेच एफटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मी शूटिंग करत होते. त्यांची परीक्षा असली की ते फिल्म्स करतात. मला दोनदा त्यांनी बोलावलं. पण, यावेळेला मी गेले. येण्या-जाण्याचा खर्च त्यांनीच केला. तिथेच धनकवडीला शंकर महाराज मंदिर आहे. तर मग मी तिथली माझी हेअर ड्रेसर आहे तिला त्याबद्दल  विचारलं. तर ती म्हणाली, आमच्या घराजवळच आहे. मग मी तिथे हार घेऊन गेले आणि लाईनमध्ये उभी होते. त्यावेळी माझ्यापाठीमागे एक बाई उभी होती. ती म्हणाली हा बेल घ्या शंकरावर वाहायला. तर मी तो घेतला आणि ठेवला. पण, मला कळेना त्या बाईला माझ्याकडे बेल नाही हे समजलं. यामागे काहीतरी आहे. कारण, मला मनापासून तिथे जायचं होतं." असा खास किस्साही त्यांनी सांगितला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Usha Nadkarni's miraculous Swami experience on way to Hinduja Hospital!

Web Summary : Usha Nadkarni recounts a miraculous experience involving Swami Samarth while visiting a relative at Hinduja Hospital. She also shares another incident of divine intervention at a temple, highlighting her unwavering faith and devotion.
टॅग्स :उषा नाडकर्णीश्री स्वामी समर्थ