Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आयुष्यात चुकीची माणसं आली अन् मोठी किंमत मोजावी लागली", सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:26 IST

"आयुष्यात चुकीची माणसं आली अन् त्यामुळे खूप मोठी किंमत मोजावी लागली", आयुष्यातील 'त्या' गोष्टींबद्दल सोनाली कुलकर्णीचं विधान

Sonali Kukarni : सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. सोनालीने आजपर्यंत अनेक मराठी,हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं  मनोरंजन केलं.सोनीली कुलकर्णी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम लेखिका देखील आहे. बऱ्याचदा ती अनेक घटनांवर त्या आपलं परखड मत मांडताना दिसते. तितकंच ती कसदार लेखनही करते.सध्या सोनाली एक मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.या मुलाखतीत तिने वैयक्तिक आणि आर्थिक आयुष्याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

नुकतीच सोनाली कुलकर्णीने 'द कांचन अधिकारी शो' मध्ये दिलेल्या  मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने आर्थिक गोष्टींबाबत आपलं मत मांडलं आहे. या दिलखुलास संवादादरम्यान तिने आपल्या आयुष्यातील एका अत्यंत नाजूक, कठीण आणि महत्त्वाच्या टप्प्यावर थेट प्रकाश टाकला. आर्थिक नियोजन आणि आयुष्यातील योग्य माणसांची पारख या अतिशय गंभीर विषयावर भाष्य करताना सोनालीने अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलं. स्वतःच्या आर्थिक नियोजनावर आपलं परखड मत व्यक्त करताना सोनाली कुलकर्णी म्हणाली, "मला माझी आर्थिक घडी अतिशय नीट ठेवायला नेहमीच आवडतं.मला माझे बँक, टॅक्स, टीडीएस यांसारखी सगळी कामं मी स्वतः करते. माझे फायनान्स मी स्वतः मॅनेज करते."

पुढे अभिनेत्रीने म्हटलं," खरंतर मला यावर वर्कशॉप घ्यायला आवडेल. मी आयुष्यात मोठी किंमत मोजली आहे. चुकीची माणसं आयुष्यात आल्यावर किती नुकसान होऊ शकतं, हे मी अनुभवलं आहे. फायनान्सचं ज्ञान नसल्यामुळे माझे खूप पैसे वाया गेले. पैसे कमवण्यासाठी जी मेहनत लागते ती मी घ्यायला तयार आहे. आणि त्या पैशांची मी काळजीही घेते. त्यामुळे मी खूप व्यवस्थित त्याचं नियोजन करते." असं ती म्हणाली.पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे, भविष्यासाठी भक्कम सुरक्षितता बाळगणं आणि व्यवहारात पारदर्शकता ठेवणं हे आयुष्यात किती महत्त्वाचे असतं, यावर तिने स्पष्टपणे या आपलं मत मांडलं. 

सोनाली कुलकर्णी तिच्या नेहमी तिचा अभिनय आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. तिचे चाहते तिच्या नवीन प्रोजेक्ट्सची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonali Kulkarni reveals financial struggles, learning from wrong people in life.

Web Summary : Sonali Kulkarni shared her financial experiences, emphasizing the importance of financial literacy and careful decision-making. She highlighted the costly lessons learned from trusting the wrong people and managing finances independently after losing money.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी