Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतला पोलीस स्टेशनमध्ये का जावं लागलं? अभिनेत्री म्हणाली- "त्या' व्यक्तीने तक्रार केली अन्...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:36 IST

"तेव्हा मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये गेले, कारण...", पूजा सावंतने सांगितला किस्सा, काय घडलेलं? 

Pooja Sawant: मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला (Pooja Sawant) ओळखलं जातं. पूजा सावंतने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली. आपली हटके स्टाईल आणि अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच अभिनेत्री आंबट शौकीन या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. त्याचदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने एका हटके प्रपोजलचा किस्सा शेअर केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं. 

'नवशक्ती' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजा सावंतने तिच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा शेअर केला. त्याविषयी बोलताना ती म्हणाली, "माझं शाळा, कॉलेज सगळं वडाळ्याला झालं आहे. त्याच्यानंतर आम्ही विलेपार्लेला शिफ्ट झालो. एके दिवशी अचानक मला वडाळा पोलीस स्टेशमधून कॉल आला. ते म्हणाले की, तुमच्या नावावर एक तक्रार दाखल झाली आहे. तर तुम्ही या, मग मी लगेगच माझ्या वडिलांना फोन केला म्हटलं पप्पा अशी एक तक्रार दाखल झाली आहे. मग पप्पांनी फोनाफोनी करुन त्याबद्दल चौकशी केली आणि विचारलं.  तर खरंच कोणीतरी तक्रार दाखल केली होती. मग एकेदिवशी मी, माझे वडील भाऊ, बहीण असे आम्ही चौघेजण वडाळा पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तेव्हा मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, पण काय माहित नाही की मी तेव्हा उत्साही का होते. ते वातावरण खूपच वेगळं होता."

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "तर तिकडे गेल्यावर मला असं समजलं की कोणीतरी काहीच संबंध नाही अशा एका व्यक्तीने तक्रार केली होती की, मी हिच्या वडिलांना ओळखतो, त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की पूजाचं लग्न त्याच्याशी लावून देतील. आम्ही त्या माणसाला ओळखत सुद्धा नव्हतो." असा एक किस्सा अभिनेत्रीने शेअर केला. 

टॅग्स :पूजा सावंतमराठी चित्रपटसेलिब्रिटी