Join us

"अभिमानाने उर भरून आला, डोळे पाणावले...", 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहून भारावली अभिनेत्री, सिद्धार्थ बोडकेबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:58 IST

"ही भूमिका खूप जबाबदारीची, अन् कठीण...", पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली...

Rutuja Bagwe On Siddharth Bodke: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या  सिनेमाची चांगलीच चर्चा सुरु आहे. अखेर आज ३१ ऑक्टोबरच्या दिवशी हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत आहे. दरम्यान, नुकताच काल या चित्रपटाचा प्रिमिअर पार पडला. त्यावेळी मराठीतील बरेच कलाकार उपस्थित राहिले. सध्या या चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे, तसंच सिद्धार्थ बोडकेच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलंय.

ऋतुजा बागवेने सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिका असलेला पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट पाहिल्यानंतर त्याबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून शेअर केली आहे.  'पुन्हा शिवाजीराजे भोसले'सिनेमा  पाहिल्यानंतर अभिनेत्री म्हणते,"प्रिय सिद्धार्थ ...!  आज तुला मोठ्या पद्द्यावर खूप महान व्यक्तिमत्व साकारताना पाहिलं, जादू करताना पाहिलं.आणि अभिमानाने उर भरून आला डोळे पाणावले.हाच तो आमचा सिद्धुड़ी “अनन्या” नाटकात स्टेजवर एंट्री घेण्याआधी एंक्सियस असायचा पाण्याच्या दोन बाटल्या संपवायचा आणि स्टेजवर पाऊल ठेवताच पहिल्या चार वाक्यात प्रेक्षाकांची मनं जिंकायचा जादू करायचा, प्रवेश संपेपर्यंत प्रेक्षकांना आपल्या भूमिकेच्या कामाच्या प्रेमात पाडायचा. 

त्यानंतर पुढे ऋतुजाने लिहिलंय, "सहकलाकार म्हणून कायम वाटायचं प्रेक्षक म्हणून ह्याचं काम पहायला काय मज्जा येत असेलं. त्याच्या अभिनयातली सहजता मी कधी आत्मसात केली मला कळलचं नाही. पुढ़े त्याची अनेक कामं प्रेक्षक म्हणून एंजॉय केली “sad सखाराम” नाटका मधलं तुझं काम पाहून ,तू माझ्या आवड़त्या कलाकरांच्या यादित क़ायम स्वरूपी जागा केलीस ज्यांच काम मला इन्स्पायर करत.आणि मी मनापासुन कायम प्रार्थना केली की तुला तुझ्या पोटेंशियलचं कडक प्रोजेक्ट मिळो.आणि आजचा तो दिवस मी जवळून पाहिला आणि त्या संधीचं तू सोनं केलस.ही भूमिका खूप जबाबदारीची आणि कठिण होती आणि तू ती लीलया पेलली आहेस. तू खूप सहज सुंदर आणि खूप खंर काम केलयस.महाराजांचे डोळे कसे असतील असा कायम मनात विचार यायचा आज ते डोळे सापड़ले आणि कलाकार,अभिनेता म्हणून तू जिंकलास.  तितिक्षा तावडेबद्दल म्हणाली...

"वर्षभरातील सगळे पुरस्कार ,प्रेक्षकांचं प्रेम, आणि उत्तमोत्तम भूमिका तुझ्या वाट्याला येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! खूप प्रेम लाडका मित्र ,आवड़ता अभिनेता @siddharthbodkeofficial आणि @titeekshaatawde आमची लाडकी वहिनी तुझं विशेष कौतुक तू क़ायम त्याच्या पाठीशी खंबीर पणे ऊभी राहिलियेस. त्याच्या या यशात तुझा मोलाचा वाटा आहे ."

'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या चित्रपटात सिद्धार्थ बोडकेसह  सयाजी शिंदे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, मंगेश देसाई तसेच शशांक  शेंडे, सिद्धार्थ जाधव यांसारखे तगडे कलाकारांच्या महत्वाची भूमिका आहे. शिवाय चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर, भार्गव जगताप यांच्या देखील भूमिका आहेत.   

English
हिंदी सारांश
Web Title : Rutuja Bagwe emotional after watching 'Punha Shivaji Raje Bhosale'.

Web Summary : Rutuja Bagwe praised Siddharth Bodke's performance in 'Punha Shivaji Raje Bhosale', expressing pride and emotion. She admired his portrayal of a great personality and acknowledged his hard work. Titiksha Tawde was also commended for her support.
टॅग्स :ऋतुजा बागवेमराठी अभिनेतासिनेमासोशल मीडिया