Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मलायका अरोरा सारखी दिसतेस", प्रिया बापटचा जीममधील व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:56 IST

Video : प्रिया बापटने शेअर केला जीममधील व्हिडिओ, फिटनेस पाहून नेटकरीही भारावले

प्रिया बापट ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करुन प्रियाने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. प्रिया तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. अनेकदा ती सोशल मीडियावरुन व्यायाम करतानाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत फिटनेसचं महत्त्व पटवून देत असते. प्रियाने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जीममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया व्यायाम करताना दिसत आहे. प्रिया तिच्या फिटनेससाठी किती मेहनत घेते हे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते अवाक् झाले आहेत. प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी प्रियाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. एकाने प्रियाची तुलना थेट मलायका अरोराशी केली आहे. 

"अमृता तू खास आहेस", रणवीर सिंहच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, अमृता खानविलकरही भारावली

नेटकऱ्याने कमेंट करत प्रियाच्या या व्हिडिओवर "मलायका अरोरा सारखी दिसतेस", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "मराठी अभिनेत्री फिटनेसकडे लक्ष देतात, हे बघून बरं वाटलं", अशी कमेंट केली आहे. "जेव्हा मुख्यमंत्री जीममध्ये जातात तेव्हा व्यायाम करण्याचं महत्त्व वाढतं," असंही म्हटलं आहे. एकाने "आम्हाला प्रोत्साहित करत राहा", अशी कमेंटही केली आहे. 

शिव ठाकरेला डेट करण्याच्या चर्चांवर बॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही एकमेकांना..."

प्रियाने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. तिची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेब सीरिज प्रचंड गाजली. आता ती 'जर तरची गोष्ट' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकात प्रियाबरोबर उमेश कामतही दिसणार आहे. 

टॅग्स :प्रिया बापटमराठी अभिनेता