Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थना बेहरेचे हे स्टनिंग फोटो तुम्ही पाहिले का ? दिलखेचक अंदाज बघून तुम्हीही म्हणाल Wow !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 06:00 IST

प्रार्थनाच्या या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात बंदिस्त झाल्या आहेत. प्रार्थनाचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत.यांत प्रार्थनाचा स्टनिंग लूक बघायला मिळतोय.

मराठी मोठा पडदा आणि छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे रूपेरी सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही अॅक्टिव असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. प्रार्थनाच्या या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात बंदिस्त झाल्या आहेत. प्रार्थनाचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत.यांत प्रार्थनाचा स्टनिंग लूक बघायला मिळतोय. यापूर्वीही प्रार्थनाने अनेक  फोटोशूट शेअर  केले आहेत. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो. हे ही फोटो पाहूनच चाहते फिदा होत आहेत. या फोटोत खूपच सुंदर दिसतेय.  प्रार्थनाने आज आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज चित्रपटसृष्टीतील प्रमुख नायिकांमध्ये प्रार्थनाची गणना होते. 

'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अॅप लग्न' अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.  

आजवर प्रार्थनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र सिनेमांची निवड करताना प्रार्थना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले. यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.मात्र आता सिनेमांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं प्रार्थनाने म्हटलं होते.

टॅग्स :प्रार्थना बेहरे