अनेक हिंदी सिनेमांमध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी कलाविश्वातही प्रसिद्ध आहे. 'भाग्यलक्ष्मी' मराठी मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. 'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेने तिला ओळख दिली. नेहाला सहा वर्षांनी मोठी मीनल ही मोठी बहीण आहे. मीनल आणि नेहा स्वभावाने एकमेकांच्या अगदीच विरुद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यात अबोला असल्याचा खुलासा नुकताच नेहाने केला.
आरपारला दिलेल्या मुलाखतीत नेहा पेंडसे म्हणाली, "गेल्या अनेक वर्षांपासून माझा बहिणीसोबत अबोला आहे. कारण आम्ही दोघी खूप वेगळे आहोत. आमचं व्यक्तिमत्व, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळंच वेगळं आहे. पण 'तिघी' सिनेमा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच मी तिच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला खूप आरोप, प्रत्यारोप झाले. इतक्या वर्षांपासून मनात जे होतं ते सगळं बाहेर आलं. पण यावेळी मात्र मी एक शहाणपणा केला तो म्हणजे मी फक्त तिचं ऐकत होते. कारण नाहीतर मी तिला कधी समजून घेणार?"
ती पुढे म्हणाली, "मी लहानपणापासून काम करत असल्याने माझं घरातलं स्थान फार वेगळं बनलं होतं. माझ्या मताला किंमत होती. पण आपल्या नात्यांना कसं जपायचं हे माझ्याकडे खूप उशिरा आलं. यावेळी मी मीनलचं ऐकून घेतलं. तिने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर होत्या असं नाही पण तू तुझी बाजू ठेव असं मी म्हणाले. आज सहा महिने झाले आहेत आणि आजही आम्हाला एकमेकांचं पटत नाहीच. मागे घडलेल्या गोष्टींमध्ये तिला माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्याच योग्य होत्या असं नाही. त्यातल्या काही बरोबर होत्या ज्या मी पूर्ण करु शकले नाही. किमान मी आज ते तिच्यासमोर मान्य केलं. मला तेव्हा गोष्टी कळल्या नाहीत, त्या वयात मला ते कळलं नाही पण जरा शांतपणे बसून मी तुझा विचार केला असता तर काही गोष्टी मी तुझ्याकरिता वेगळ्या पद्धतीने करु शकले असते."
नेहा पेंडसेच्या बहिणीचं नाव मीनल पेंडसे आहे. ती 'टॅरो कार्ड रिडर' आहे. मीनल प्रसिद्धीझोतापासून दूरच असते. नेहा लहानपणापासून काम करत असल्याने त्यांची आई कायम नेहासोबतच असायची. तसंच मीनल स्वभावाने एकदम चंचल तर नेहा शांत होती. यामुळे दोघींचं अजिबात पटायचं नाही असा खुलासा नेहाने केला आहे.
Web Summary : Neha Pendse disclosed a long-standing estrangement from her sister, Meenal, due to differing personalities. After years of distance, Neha initiated reconciliation, acknowledging Meenal's perspective and past expectations. Though disagreements persist, Neha now understands her sister better.
Web Summary : नेहा पेंडसे ने अपनी बहन मीनल से वर्षों पुराने अलगाव का खुलासा किया, जिसकी वजह अलग व्यक्तित्व हैं। सालों बाद, नेहा ने सुलह की पहल की और मीनल के नजरिए को समझा। असहमति के बावजूद, नेहा अब अपनी बहन को बेहतर समझती है।