Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सुनिधी चौहानने घट्ट मिठी मारली अन्...",मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' भारावून टाकणारा प्रसंग, असं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:33 IST

"सुनिधी चौहानने घट्ट मिठी मारली अन्...", गायिकेच्या 'त्या' कृतीने भारावली अभिनेत्री, सांगितली खास आठवण

Neha Joshi: एखाद्या कलाकारासाठी त्याच्या चाहत्यांकडून होणारं कौतुक किंवा त्यांच्या प्रतिक्रिया या कायम खास असतात. कोणताही कलाकार आपल्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी आसुसलेला असतो. आणि जेव्हा एखादा प्रेक्षक किंवा चाहता  त्यांना प्रत्यक्षात प्रतिक्रिया देतो तेव्हा कलाकार सुद्धा भारावून जातो. असाच काही प्रकार अभिनेत्री नेहा जोशीसोबत घडला होता.चक्क लोकप्रिय गायिका सुनिधी चौहानने तिचं काम पाहून भरभरून कौतुक केलं होतं. 

नेहा जोशीला तिच्या एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान सुनिधी चौहान भेटायला आली आणि यावेळी तिने दिलेल्या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे नेहा भारावून गेली होती. याबद्दल स्वत: नेहा जोशीने सांगितलं आहे. नुकतीच नेहाने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. दरम्यान, तिला आपण मराठी इंडस्ट्रीत जेव्हा वावरतो, अनेकांबरोबर भेटीगाठी होतात. तेव्हा ही आपलीच आहे, हिला काय फरक पडतो. हिला का फॉरमॅलीटी द्यायची असं घडतं.असं खरंच आहे? यावर बोलताना नेहा म्हणाली,"हो, मराठीमध्ये असं आहे. बहुतेक ते झालंय, म्हणजे काम करताना आपण घरच्यांसारखे वागतो. तेव्हा आपण जे समोरच्याला गृहित धरतो त्यामुळे असं सगळं झालं आहे."

सुनिधी चौहानने केलेलं असं काही...

पुढे नेहा म्हणाली,"मी अमोल गुप्ते यांचा हवाहवाई नावाचा सिनेमा केला होता. त्याचं एक छोटसं स्क्रिनिंग झालं होतं. त्या सिनेमाचं संगीत तिच्या नवऱ्याने केलं होतं. तेव्हा  इंटर्व्हलमध्ये सुनिधी चौहान आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. ती मला म्हणाली, आता मध्यांतरानंतर मला रडवू नका. तुम्ही मला खूप रडवलंय त्यामुळे मी टेन्शनमध्ये आले. तुम्ही ओळखूच येत नाही. मी कोणालातरी तुमच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या तुम्हीच आहात. काय कलाकार आहात तुम्ही... हा माझा पहिला हिंदी सिनेमा होता."

या मुलाखतीत पुढे अभिनेत्रीने सांगितलं."पण, तेव्हा सुनिधी चौहान इतकं प्रेमाने माझ्याशी बोलली. शिवाय आदरयुक्त भावनेने बोलली, या गोष्टी कुठेतरी आपल्याकडे पाहायला मिळत नाही. यासाठी आपल्याला खूप वाट बघावी लागते. कदाचित,गृहित धरणं हाच मुद्दा असतो. ही तर आपलीच आहे, असं समजलं जातं. काही गोष्टी एखाद्या सिनेमासारख्या आपल्या आठवणीत राहतात तशीच ही गोष्ट आहे."

वर्कफ्रंट 

मराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नेहा जोशीला ओळखलं जातं. नेहा जोशीने आजवर मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.नेहाने 'पोश्टर बॉईज', 'फर्जंद', 'नशिबवान', 'हवा हवाई' अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील ती झळकली आहे. 

टॅग्स :नेहा जोशीसुनिधी चौहानसेलिब्रिटी