Join us  

पहिल्यांदाच किशोरी शहाणेंनी शेअर केला लग्नाचा अल्बम; 'हा' बॉलिवूड दिग्दर्शक आहे अभिनेत्रीचा पती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 4:53 PM

Kishori shahane: किशोरी आणि त्यांच्या नवऱ्याची पहिली भेट अभिनेता जॅकी श्रॉफ याच्यामुळे झाली होती.

मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे (kishori shahane). 'सगळीकडे बोंबाबोंब', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'दुर्गा झाली गौरी', 'मोरुची मावशी' अशा कितीतरी चित्रपट, नाटक आणि आता मालिकांच्या माध्यमातून किशोरी शहाणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं आहे. किशोरी यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या पर्सनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

मराठीपेक्षा हिंदी कलाविश्वात विशेष सक्रीय असलेल्या किशोरी शहाणे सोशल मीडियावरही कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम त्यांच्या मालिकांच्या सेटवरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्येच त्यांनी त्यांच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच चाहत्यांना किशोरी यांच्या लग्नातील काही क्षण फोटोच्या माध्यमातून अनुभवता आले.काही दिवसांपूर्वीच किशोरी आणि दिपक विज यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत दिपक यांना शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नातील काही मोजके फोटो कोलाज केले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, किशोरी शहाणे यांनी बॉलिवूड दिग्दर्शक दिपक विज यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यामुळे किशोरी आणि दिपक यांची पहिली भेट झाली होती. सुरुवातीला या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात आणि पुढे लग्नात रुपांतर झालं. या जोडीला बॉबी हा मुलगा असून तो सुद्धा सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे.

 

टॅग्स :किशोरी शहाणेसिनेमासेलिब्रिटीबॉलिवूडजॅकी श्रॉफ