Join us
Daily Top 2Weekly Top 5

तूच माझा सांता म्हणत हेमांगी कवीने सोशल मीडियावर शेअर केला पतीचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:11 IST

हेमांगी कवीने तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर करत तूच माझा सांता असे लिहिले आहे. त्या दोघांचा हा रोमँटिक अंदाजातील फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देहेमांगीने रोमँटिक अंदाजातील पतीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, नवऱ्याच्या रुपात तूच माझा सांता... कारण माझ्या प्रत्येक गोष्टीला तू "ho ho hooo" म्हणतोस!

हेमांगी कवीने फक्त लढ म्हणा, डावपेच, कोण आहे रे तिकडे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ठष्ट, ती फुलराणी या नाटकांमधील तिच्या भूमिकेचे तर खूपच कौतुक झाले आहे. हेमांगी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच समाजात होत असलेल्या घटनांविषयी सोशल मीडियाद्वारे तिचे मत मांडत असते. तिने सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेमांगी कवीने तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर करत तूच माझा सांता असे लिहिले आहे. हेमांगीने रोमँटिक अंदाजातील पतीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, नवऱ्याच्या रुपात तूच माझा सांता... कारण माझ्या प्रत्येक गोष्टीला तू "ho ho hooo" म्हणतोस! हेमांगीने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही पोस्ट शेअर केली असून या फोटोत हेमांगी आणि तिचा पती संदीप धुमाळ खूपच क्यूट दिसत असल्याचे तिचे फॅन्स तिला कॅप्शनच्या माध्यमातून सांगत आहेत. 

हेमांगीचा हा फोटो तिच्या फॅन्सना खूप आवडला आहे. काहीच वेळात या फोटोला १२ हजाराहून अधिक जणांनी लाईक केले आहे. सामान्य लोकांसोबत श्रुती मराठे, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी यांसारख्या सेलिब्रेटींनी देखील या पोस्टवर कमेंट केले आहे. 

हेमांगी आपल्या रोखठोक बिनधास्त अंदाजामुळेही चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून आपले चाहत्यांच्या संपर्कात असते. काही महिन्यांपूर्वी हेमांगीने केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले होते की, आधीच 100 दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही 100 दिवसांची भर! 365 पैकी 200 दिवस पैसे अकाऊंटला जमा होणार नाहीत...कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये! इन्शरन्स पॉलिसेचे हप्ते कसे भरायचे? घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचं काय? उरलेल्या 165 दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत फोन करायचा, मेसेज करायचे... आज ...उद्या... या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही! कलाकार आणि टेक्निकल टीमकडून पूर्ण सपोर्टची अपेक्षा !

टॅग्स :हेमांगी कवी