Join us

"कधीही भेटलो तरी डाएटवर...", संजय जाधव यांच्या वाढदिवशी हेमांगी कवीची पोस्ट, शेअर केले पार्टीतील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:09 IST

अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील संजय जाधव यांच्या वाढदिवशी खास पोस्ट केली आहे. 

'दुनियादारी', 'येरे येरे पैसा', 'प्यार वाली लव्ह स्टोरी', 'तू ही रे', 'खारी बिस्किट', 'फक्त लढ म्हणा' असे एक सो एक हिट सिनेमे सिनेसृष्टीला दिलेल्या दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या संजय जाधव यांचा आज वाढदिवस आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखीलसंजय जाधव यांच्या वाढदिवशी खास पोस्ट केली आहे. 

संजय जाधव यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या बर्थडे पार्टीतील काही फोटो हेमांगीने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने खास पोस्टही लिहिली आहे. 

हेमांगी कवीची पोस्ट! 

ज्याच्या बाहू इतक्या विशाल की आख्ख्या इंडस्ट्रीला आपल्या कवेत सामावून घेतो!

मन एवढं मोठं की चुकलेल्यालाही सहज माफ करतो!

फौलादी शरीर कवच पण वाढदिवसाला झालेली गर्दी पाहून, लहान मुलासारखा गात्र गात्र गहिवरतो!

नेहमी भेटलो तर ‘diet’ म्हणून काही न काही सोडलेलंच असतं... सिगारेट, मैदा, तेल, साखर! पण स्वतःतला गोडवा मात्र तसूभर ही कमी केलेला नसतो!

पार्टीतनं कुणी निघायचं म्हटलं तर त्यांना “ए किधर जा रहा है तू?, अब सुबह मस्त कांदा पोहे खाके निकल” म्हणत त्याला पहाट आणि पहाटेची स्वप्नं दाखवतो!

निगेटीव्हिटीला चेकमेट देत, पॉझिटिव्हिटीशी रिंगा रिंगा खेळत, बेधुंद मनाच्या लहरींवर “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया” म्हणत दुनियादारी करतो!

किती ही अडचणी येऊ देत, स्वप्न मात्र मोठ्ठी 70mm Dolby Atmos च बघतो!

हॅपी बर्थडे संजय दादा अँड लव्ह यू!

संजय जाधव यांच्या वाढदिवशीच आज येरे येरे पैसा ३ हा सिनेमादेखील प्रदर्शित होत आहे. या सिनेमात उमेश कामत, संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, वनिता खरात अशी स्टारकास्ट आहे. 

टॅग्स :संजय जाधवहेमांगी कवी