Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तिच्या लग्नात साक्षीदार म्हणून सही केली", आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल गिरीजा ओकचं वक्तव्य, म्हणाली- "खूप हिंमत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:10 IST

“आईच्या दुसऱ्या लग्नात साक्षीदार झाले”, गिरीजा ओकने व्यक्त केल्या भावना, म्हणाली...

Girija Oak: मराठीसह बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक. आतापर्यंत तिने हिंदी, मराठी मालिकांसह सिनेमा, वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. नॅशनल क्रश गिरीजा ओक मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या गिरीजा तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे.  

​अभिनेत्री गिरिजा ओकने नुकत्याच सुलेखा तळवळकर यांच्या 'दिल के करीब' यापॉडकास्टमध्ये आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल एक अतिशय हृदयस्पर्शी आठवण शेअर केली.  त्यादरम्यान, ती म्हणाली,"आई मी हे तुला कधीच बोलले नाही. मी खूप काम करू लागले होते लग्नाआधी आणि लग्नानंतरही पुढची काही वर्षे कामं चालू होती. तेव्हा मी एकटी राहायचे.  सुहृद आणि माझं लग्न झालं त्यावेळीही अनेकदा मी एकटी असायचे. कबीरच्या जन्मानंतरही मी मुंबईला एकटीच राहायचे. इंडस्ट्रीत सलग १२-१२ तास आपल्या शिफ्ट असतात. त्याच्या पुढे-मागे प्रवासाचा वेळ, कधी-कधी १६ तासांचा दिवस होतो. हे सगळं करुन घरी आल्यानंतर आपल्या घरात कुणीच नाहीये, हे मला फार आवडायचं नाही.शिवाय माझ्या घरातले सगळेच याच क्षेत्रात असल्याने प्रत्येकजण कामात व्यग्र असायचो. त्यावेळी वाटायचं की,आज जर आई असती, तर तिने माझ्यासाठी दार उघडलं असतं, मला गरम जेवण वाढलं असतं.तेव्हा मला तिची खूप आठवण यायची.कारण माझ्या लग्नाच्या आधीच आईचं दुसरं लग्न झालं होतं.आम्ही याबद्दल बोललो होतो. मला याचा आनंदच झाला होता."

मग पुढे गिरिजा म्हणाली,"खरंतर, यासाठी हिंमत लागते. तिने पु्न्हा एकदा आपलं आयुष्य उभं केलं, स्वत:चं सुख तिने आपल्या हातून घडवलं. कशाला उगाच मी एका कोपऱ्यात पडून राहते, असा विचार तिने केला नाही.तिने तिचं एक घर, नवरा, मुलं यांच्याबरोबर नवं नातं निर्माण केलं. इतकंच नाही तर मी तिच्या लग्नात साक्षीदार म्हणून सही केली होती. ते असं होतं की, मी माझ्या आईला तुमच्याकडे पाठतेय. माझी ती भावना होती. तिच्यासाठी मी आनंदी होते. पण कधी तरी मनात अशी गोष्ट यायची की का? माझी आई माझ्याजवळ का नाही? तिचं एक वेगळं कुटुंब आहे ती माझ्याजवळ का नाही.  असं मला कुठल्यातरी दिवशी खूप दमून,थकून आल्यानंतर वाटायचं. पण, मग तेव्हा हाच विचार डोक्यात यायचा की तिचं एक वेगळं आयुष्य आहे." असं गिरीजाने सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Girija Oak witnesses mother's second marriage, praises her courage.

Web Summary : Girija Oak shared a heartfelt story about her mother's remarriage, admiring her courage to rebuild her life. Girija signed as a witness at the wedding, happy for her mother's new chapter, though occasionally missing her presence.
टॅग्स :गिरिजा ओकमराठी चित्रपटसेलिब्रिटी