Disha Pardeshi On Raja Shivaji Movie:अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. १ मे महाराष्ट्रदिनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट रिलीज झाला आहे. दरम्यान, राजा शिवाजी या ऐतिहासिक सिनेमात दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते आहे.
राजा शिवाजी सिनेमात रितेश देशमुखसह जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.तसेच कपिल होनराव, शिवानी मुंढेकर आणि दिशा परदेशी हे मराठी टीव्हीवरील लोकप्रिय चेहरे देखील पाहायला मिळत आहेत.लोकप्रिय मराठी अभिनेत्री दिशा परदेशीनं या सिनेमात अफजल खानच्या बडी बेगमची भूमिका साकारली आहे. अफजल खान या सिनेमात त्याच्या ६३ बेगमची हत्या करतो. हा सीन अंडर वॉटर शूट केला गेला आहे. हा या खास सीनच्या शूटिंगचा अनुभव अभिनेत्री दिशा परदेशीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बेगमच्या हत्येचा सीन शूट करण्यासाठी दिशासह इतर कलाकारांना खास ट्रेनिंग देण्यात आलं होतं. आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकांउंटवर शूटिंग दरम्यानचे काही फोटो पोस्ट करत दिशाने लिहिलंय, ‘राजा शिवाजी’ मधील त्या बहुचर्चित आणि प्रभावी पाण्याखालील दृश्याचा भाग होणं, माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. अफजल बेगमच्या भूमिकेतून त्या प्रसंगाची ‘वेदना’ आणि ‘तीव्रता’ साकारताना खूप काही शिकायला मिळालं."
पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, या संपूर्ण वॉटर सिक्वेन्ससाठी रितेश सरांनी आम्हा सगळ्यांना आधीपासूनच उत्तम ट्रेनिंग दिलं. पाण्याखाली अभिनय करणं, तासन्तास श्वासावर नियंत्रण ठेवणं, आणि प्रत्येक शॉटची अचूक तयारी—हे सगळं इतकं बारकाईने प्लॅन केलं गेलं होतं की आम्हाला सेटवर पूर्णपणे सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटत होता.सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतल्यामुळे हा कठीण सीनही खूप सहज झाला. अशा टीमसोबत काम करणं खरंच भाग्याची गोष्ट आहे.
राजा शिवाजी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. सिनेमाने पहिल्या पाच दिवसांतच तिकिटबारीवर चांगलं कलेक्शन केलं आहे.
Web Summary : Disha Pardeshi recounts filming 'Raja Shivaji's' underwater scene, portraying Afzal Khan's Begum. She praises the training and meticulous planning by the team, especially Ritesh Deshmukh, ensuring safety and confidence. The movie is currently performing well at the box office.
Web Summary : 'राजा शिवाजी' के पानी के नीचे के दृश्य में अफजल खान की बेगम का किरदार निभाने वाली दिशा परदेशी ने प्रशिक्षण और टीम की योजना की प्रशंसा की। रितेश देशमुख ने सुरक्षा सुनिश्चित की। फिल्म बॉक्स ऑफिस पर अच्छा प्रदर्शन कर रही है।