Join us

हिंदीत रेखा अन् मराठीत ऐश्वर्या...! ‘सदाबहार’ ऐश्वर्या नारकरांचा हा VIDEO एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:58 IST

Aishwarya Narkar Video : बॅकग्राऊंडला ‘कभी आर कभी पार...’ हे गाणं आणि सोबतीला ऐश्वर्या यांच्या एकापेक्षा एक मनमोहक अदा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Aishwarya Narkar Video : सदाबहार अभिनेत्री म्हटलं की, बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा चेहरा डोळ्यांपुढे येतो आणि मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री आठवायचं म्हटलं की, एकाच अभिनेत्रीची आठवण होते. ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar). मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ऐश्वर्यांनी वयाची पन्नाशी कधीच ओलांडलीये, पण सौंदर्य असे की, आजही चाहते त्यांच्या सौंदर्यावर फिदा आहेत. तूर्तास ऐश्वर्या यांच्या एका  व्हिडीओची चर्चा आहे.

होय, सोशल मीडियाच्या जमान्यात ट्रेंड फॉलो करायला कुणाला आवडत नाहीत. ऐश्वर्या यांनीही ट्रेंड फॉलो करत, एक व्हिडीओ शेअर केला. बॅकग्राऊंडला ‘कभी आर कभी पार...’ हे गाणं आणि सोबतीला ऐश्वर्या यांच्या एकापेक्षा एक मनमोहक अदा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यांच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहेत, हे नव्यानं सांगणे नकोच.

ऐश्वर्या या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आलेल्या ऐश्वर्या यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.  चाहत्यांच्या कायम संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात.

रोज नवे व्हिडीओ, फोटो त्या शेअर करतात.  ऐश्वर्या यांनी अपराध ,  धड़क,  अंकगणित अशा अनेक या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच श्रीमंता घरची सून, दुहेरी, रेशीमगाठी, सोनपावले, या सुखांनो या, स्वामिनी, ये प्यार ना होगा कम, घर की लक्ष्मी बेटीयाँ अशा असंख्य मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :ऐश्वर्या नारकर