Join us

Video: नुसती धम्माल! जस्टिन बिबरच्या गाण्यावर अभिज्ञाने केला वडिलांसोबत डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:45 IST

Abhidnya bhave: अभिज्ञाने कोणत्याही मराठी किंवा बॉलिवूड गाण्याची निवड केली नसून थेट हॉलिवूडचं गाणं निवडलं आहे. मात्र, त्या गाण्यावरही अभिज्ञाच्या बाबांनी भन्नाट ठेका धरला आहे.

ठळक मुद्देअभिज्ञा आणि तिच्या वडिलांचा हा डान्स व्हिडीओ तिच्या आईने शूट केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अभिज्ञाने तिचा स्वतंत्र असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिज्ञा कायमच प्रयत्न करत असते. अनेकदा ती तिच्या जीवनातील लहानमोठ्या गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने तिच्या वडिलांसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिच्या वडिलांचा डान्स पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या वडिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी अभिज्ञाने कोणत्याही मराठी किंवा बॉलिवूड गाण्याची निवड केली नसून थेट हॉलिवूडचं गाणं निवडलं आहे. मात्र, त्या गाण्यावरही अभिज्ञाच्या बाबांनी भन्नाट ठेका धरला आहे.

ना स्टारडम ना सिक्युरिटी! अभिनेत्याने खाल्ला हातगाडीवरचा मसाला डोसा

अभिज्ञा आणि तिच्या वडिलांनी पॉप स्टार जस्टिन बिबरच्या गाण्यावर डान्स केला असून त्यांचा व्हिडीओ अभिज्ञाच्या आईने शूट केला आहे. त्यामुळे अभिज्ञाच्या आनंदात तिचे आई-बाबादेखील सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, अभिज्ञा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून आतापर्यंत तिने अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. लवकरच ती पवित्र रिश्ता २ मध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :अभिज्ञा भावेनृत्यसेलिब्रिटीटिव्ही कलाकार