Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौतुक करावे तितके कमी, ठरलेले लग्न रद्द करुन मराठी अभिनेता होणाऱ्या पत्नीसह करतोय रुग्णांची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 11:59 IST

गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आहेत. मात्र असेही काही कलाकार आहेत. ज्यांनी कोरोना काळात लग्नाची तारिख पुढे ढकलत मदतीसाठी मैदानात उतरले आहेत.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आहेत. मात्र असेही काही कलाकार आहेत. ज्यांनी कोरोना काळात लग्नाची तारिख पुढे ढकलत मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. कोरोनाकाळात अनेक सेलिब्रेटी दिवस रात्र मदत करताना दिसत आहेत. अशात एका मराठी अभिनेत्याने तर त्याच्या लग्नाची तारिख रद्द करत होणा-या पत्नीसह कोरोना रुग्णांची निस्वार्थ सेवा करत आहेत. सिद्धेश प्रभाकर लिंगायत असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्याच्या केलेल्या कामाचा कुठेही गाजावाजा न करता तो दिवस रात्र अविरतपणे कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.

“बारायन”, “प्रेमाचा कट्टा”, “बाजी”, “टाईम पास २”, “खारी बिस्किट”, “उनाड” यांसारख्या अनेक सिनेमात तो झळकला आहे. इतकेच नाही तर “जागो मोहन प्यारे, लक्ष्य, ऐक नंबर, प्रेम हे, प्रिति परी तुझवरी, गाव गाता गझाली ह्या सारख्या मालिकात देखील त्याने भूमिका साकारल्या आहेत. गेल्या आठ वर्षापासून सिद्धार्थ अभिनयक्षेत्रात रसिकांचे मनोरंजन करत आहे.

त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार त्याने अनुभवले आहेत. कोरोना काळात देशावर ओढावलेले संकटात आपणही काहीतर देणे लागतो याच भावनेने तो रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त झाला आहे. सिद्धार्थला त्याच्या होणा-या पत्नीचीही मोलाची साथ मिळाली आहे. महेश्वरी असे त्याच्या होणा-या पत्नीचे नाव आहे. त्यामुळे या कार्यात सिद्धार्थप्रमाणेच महेश्वरीचेही करावे तितके कौतुक कमीच आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रुग्णालयांत बेड, ऑक्सिजन, रेमडीसिविर इंजेक्शन, प्लाझ्मा इत्यादी गोष्टींची कमतरता भासतेय. अनेक लोक एकमेकांची मदत करत आहेत.आता यामध्ये बॉलिवूडच नाही तर मराठी कलाकारदेखील पुढे सरसावले आहेत. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, इत्यादी गोष्टी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती शेअर करत आहेत. तर काहीजण लोकांना ऑक्सिजन, इंजेक्शन, आणि बेड देण्यामध्ये व्यग्र आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस