Join us  

"हे खरंच खूप बेसिक मॅनर्स..." मराठमोळ्या अभिनेत्यानं पापाराझींना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 7:48 PM

#जोगबोलणार या हॅशटॅगसह त्याने एक पोस्ट शेअर केली.

गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत 'पापाराझी कल्चर' मोठ्या प्रमाणावर वाढलंय. सेलिब्रिटी कुठेही गेले तरी त्यांच्या मागे हे पापाराझी असतातच. बॉलिवूडसेलिब्रिटींचा पार्टी लूक, एअरपोर्ट लूक ते अगदी जिमपर्यंत हे पापाराझी सेलिब्रिटींना फॉलो करतात आणि त्यांचे फोटो घेतात. पण, अनेकदा या फोटोंचा अँगल चुकलेला असतो. यामुळेच अनेक सेलिब्रिटी पापाराझींवर भडकतात. आता यावर मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग याने सुचक पोस्ट शेअर केली आहे.

पुष्कर जोग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. #जोगबोलणार या हॅशटॅगसह त्याने एक पोस्ट शेअर केली.  महिला कलाकारांचे चुकीच्या अँगलने फोटो पापाराझींकडून काढले जातात, यावर त्यानं आपलं रोखठोक मत मांडलं. त्याने लिहलं, 'पापाराझींनी महिला कलाकारांचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो/व्हिडीओ काढणं थांबवलं पाहिजे. अशाप्रकारचे फोटो काढल्यावर महिला कलाकारांना जर अस्वस्थ वाटत असेल तर, कृपया त्यांचा आदर करा. हे खरंच खूप बेसिक मॅनर्स आहेत. चला सन्मानाने राहूया'. यावर त्याने 'हे बरोबर आहे का? हो किंवा नाही' असा पोलही घेतला. 

सोशल मीडियावर आपण अभिनेत्रींचे असे अनेक व्हिडीओ पाहतो, ज्यामध्ये जाणूनबुजून त्यांना झूम-इन करून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं. काही दिवसांपुर्वीच एका मुलाखतीत बिग बॉस फेम आयेशा खान हिने 'पापाराझी कल्चर'वरून सुनावलं होतं. याआधी आलिया भट्ट, अनुष्का शर्मा यांनीसुद्धा पापाराझींना फटकारलं होतं. यासोबततच मृणाल ठाकूर, हिना खान, पलक तिवारी यांनी देखील पापाराझींच्या चुकीच्या अँगलने फोटो काढण्यावर नाराजी दर्शवली होती.  

टॅग्स :पुष्कर जोगसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल व्हायरलजान्हवी कपूरमृणाल ठाकूर