Vikas Samudre: मराठीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयासह विनोदी कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यापैकीच एक नाव म्हणजे विकास समुद्रे. अभिनेते विकास समुद्रे याने आजवर अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्येही कामं केली आहेत. विनोदी अभिनेता म्हणून मराठी मनोरंजनसृष्टीत ते प्रसिद्ध आहेत. लोकप्रिय कार्यक्रम ‘फू बाई फू’,'कॉमे़डी एक्सप्रेस'मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती. शिवाय नवरा माझा नवसाचा सिनेमातील त्यांची भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात कायम आहे. मात्र,काही वर्ष हा लोकप्रिय अभिनेता इंडस्ट्रीपासून दूर होता.विकास समुद्रे यांना ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराने ग्रासलं होतं.
नुकत्याच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत विकास समुद्रे यांनी आपल्या आयुष्यातील त्या कठीण काळावर भाष्य केलं आहे."१४ जानेवारी २०१७ ला माझं ब्रेन हॅमरेज झालं. पण, ते का झालं हे डॉक्टरांना आजपर्यंत कळलं नाही. तेव्हा माझं सारखं डोकं दुखायचं त्यामुळे मी घरी न सांगता डोकेदुखीमुळे दिवसाला ८-१० गोळ्या घ्यायचो. पण, तेव्हा आपण जाऊन सिटी स्कॅन वगैरे करावं हे कधी सुचलंच नाही. मग एक दिवस मी अचानक कोसळलो. "
त्यानंतर मग पुढे अभिनेता म्हणाला,"तिथून मग मला रुग्णालयात नेण्यात आलं. रविवार असल्यामुळे त्या दिवशी कोणीही सर्जन तिथे नव्हता.तरी देखील त्यांनी संपर्क करून ठाण्याहून एका डॉक्टरांना बोलावून घेतलं. त्यांनी माझ्यावर उपचार केले. त्या दिवशी तिकडे ब्रेन हॅमरेज झालेले असे तीन पेशंट होते. ते दोघेजण दगावले आणि मी एकटा वाचलो. डॉक्टरांना माझ्याबद्दल काहीच माहित नव्हतं. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्वतःचं नाव वाचलं.त्या काळात बरेच कलाकार मला भेटून गेले. पण मी शुद्धीत नसल्यामुळे मला काही कळलं नाही. खूप लोकांनी आर्थिक मदत केली.बायकोने खूप जीवाचं रान करून पैसे गोळा केले. कारण तेव्हा २०-२२ लाखांचा ऑपरेशनचा खर्च होता. त्यातून माझं ऑपरेशन झालं."
आपलं कोण परकं कोण ते कळालं...
"त्याकाळात माझ्यामुळे जे मोठे झाले, ज्यांना मी स्क्रीन दाखवली, ते लोक मला भेटायला आले नाही कधीच. ना कधी विचारपूस केली किंवा आजतागायत ते कधी भेटायला आले नाहीत. पण,यामुळे आपलं कोण परकं कोण ते कळालं. या गोष्टीला आता ९ वर्ष पूर्ण झाली. याचं मला थोडं वाटलं. माझे जे फोटो व्हायरल झाले, ते कोणी काढले हे कळलं नाही आजपर्यंत.काही ग्रुप्सवर तर माझ्या निधनाच्या बातम्या आल्या. माझे असे अनेक फोटो व्हायरल झाले होते."
Web Summary : Actor Vikas Samudre suffered a brain hemorrhage in 2017, leading to a challenging period. He revealed the ordeal, including financial struggles and support from unexpected sources, highlighting who stood by him during his health crisis.
Web Summary : अभिनेता विकास समुद्रे को 2017 में ब्रेन हैमरेज हुआ, जिससे मुश्किल दौर आया। उन्होंने वित्तीय संघर्षों और अप्रत्याशित स्रोतों से समर्थन सहित परीक्षा का खुलासा किया, और बताया कि स्वास्थ्य संकट के दौरान कौन उनके साथ खड़ा था।