Join us

हर हर महादेव! कपाळावर गंध अन्...; मराठी अभिनेत्याने गाठलं केदारनाथ, शेअर केली पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:49 IST

जय भोलेनाथ! भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन झाला मराठी अभिनेता, शेअर केले खास क्षण 

Chinmay Udgirkar : हिंदू भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या जोरदार हिमवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराचे द्वार बंद केलं जातं. त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या आसपास हे मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं. नुकतीच अभिनेता चिन्मय उदगीरकरने (Chinmay Udgirkar) केदारनाथ धामला भेट दिली. हा प्रसंग त्याच्यासाठी अगदीच खास असून तो क्षण कॅमेऱ्यात कैद करुन त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 

 केदारनाथ मंदिर हे उत्तर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. लाखोंच्या संख्येने देश-विदेशातून भाविक तिथे येत असतात. दरम्यान, मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर चिन्मय उदगीरकर तिथे पोहोचला आहे. सोशल मीडियावर चिन्मयने अतिशय खास अशी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. केदारनाथला जाऊन त्याने महादेवाचे दर्शन घेतले आणि त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे . "बंद कर सब द्वार, अपने दीदार है केदार …अंदर डुबकी लगलो रे..एकला चालो रे...", असं कॅप्शन देत चिन्मय उदगीरकरने  या फोटोमध्ये अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील भक्तीची भावना स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचबरोबर फुलांनी सजवलेल्या मंदिराचे वातावरण आणखीनच दिव्य भासत असल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळते. अभिनेत्याच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

वर्कफ्रंट 

अभिनेता चिन्मय उदगीरकर हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. 'स्वप्नांच्या पलीकडले', 'नांदा सौख्यभरे' तसेच 'घाडगे & सून' यांसारख्या मालिकांमधून काम करत प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. तसंच अभिनेता मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा झळकला आहे. 

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकरमराठी अभिनेताकेदारनाथसोशल मीडिया