Join us
Daily Top 2Weekly Top 5

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केली सोशल मीडियावर एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:04 IST

अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले असून त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे अकाऊंट सुरू केले आहे.

ठळक मुद्देअशोक सराफ यांनी सोशल मीडियावर एंट्री केली आहे. फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने त्यांचं अकाऊंट असून इन्स्टाग्रामवर #realashoksaraf या नावाने त्यांचं अकाऊंट आहे.

अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकाराशी संवाद साधत असतात. पण या सोशल मीडियाच्या जगतापासून आजवर अशोक सराफ यांनी दूर राहाणेच पसंत केले होते. पण आता त्यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे.

अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले असून त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे अकाऊंट सुरू केले आहे. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर एंट्री केली आहे. फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने त्यांचं अकाऊंट असून इन्स्टाग्रामवर #realashoksaraf या नावाने त्यांचं अकाऊंट आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर काही पोस्ट देखील केल्या आहेत. त्यांची एक पोस्ट तर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या पोस्टमध्ये प्रेक्षकांच्या आवडत्या धनंजय माने या व्यक्तिरेखेचा उल्लेख करण्यात आला आहे.

अशोक सराफ यांनी त्यांचा फोटो पोस्ट करत सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत माझा नवा डिजिटल प्रवास सुरु झालाय आणि हो धनंजय माने इथेच @ashoksarafofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवर राहतात... असे लिहिले आहे. 

अशोक सराफ यांच्या अकाऊंटवर आपल्याला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे देखील काही फोटो पाहायला मिळत आहेत. तसेच आदिनाथ कोठारेची गोंडस मुलगी जियासोबतचा देखील एक फोटो त्यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. 

अशोक सराफ यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत.

टॅग्स :अशोक सराफआदिनाथ कोठारे