Join us

मराठमोळ्या पुरस्कार सोहळ्यात धकधक गर्लनं जिंकली मनं,श्रेया बुगडेसह माधुरीची फुगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 15:07 IST

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित जे काही करते त्याची आपसुकच चर्चा होते.मराठमोळ्या माधुरीचा अभिनय, डान्स, तिचं हास्य अशा प्रत्येक ...

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित जे काही करते त्याची आपसुकच चर्चा होते.मराठमोळ्या माधुरीचा अभिनय, डान्स, तिचं हास्य अशा प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून माधुरी रसिकांच्या काळजात घर करुन आहे. सध्या माधुरी रुपेरी पडद्यापासून काहीशी दूर आहे.तिचा कोणताही सिनेमा गेल्या काही महिन्यांत रसिकांच्या भेटीला आलेला नाही. असं असलं तरी विविध रियालिटी शोमध्ये ती झळकते. तिचा या शोमधील जजची भूमिकाही रसिकांना भावली. तर कधी माधुरी विविध पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहते. या सोहळ्यात उपस्थित राहत डान्सची झलक दाखवून ती उपस्थितांना मंत्रमुग्ध करते.नुकतंच अशाच एका मराठी पुरस्कार सोहळ्यात माधुरी अवतरली.तिच्या उपस्थितीने या सोहळ्याला जणू काही चारचाँद लावले.निळ्या रंगाच्या साडीत माधुरी मंचावर अवतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.तिची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर झाले होते.तर दुसरीकडे मराठी सेलिब्रिटींची अवस्थाही काही वेगळी नव्हती. यावेळी मराठी स्टार्सना माधुरीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी मंचावर माधुरी चक्क चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेसोबत फुगडी खेळताना दिसली. यावेळी दोघींचा उत्साह आणि आनंद पाहण्याजोगा होता. रसिकांनीही या फुगडीला मनापासून दाद दिली. लवकरच माधुरी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.तिचा 'बकेटलिस्ट' हा पहिला सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे मराठमोळ्या माधुरीच्या या पहिल्या सिनेमाची रसिकांना प्रतीक्षा लागली आहे.मात्र तिच्या या सिनेमाआधी एका मराठी सिने पुरस्कार सोहळ्यातील मराठमोळा अंदाच चांगलाच भाव खाऊन गेला आहे. प्रेक्षकांचा लाडका आदिनाथ आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत काम करणार आहे.आदिनाथनेच ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. त्याने माधुरी दीक्षित सोबतचा एक फोटो पोस्ट करून समथिंग न्यू (काहीतरी नवे) आणि वर्किंग विथ लिजंड (मी लिजंड सोबत काम करत आहे) असे हॅशटॅग दिले आहेत. त्यावरून आदिनाथ माधुरीसोबत काम करत असल्याचे आपल्याला कळत आहे. पण आदिनाथ माधुरीसोबत कोणत्या चित्रपटात काम करत आहे याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे.माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून त्यानंतर ती आता एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.माधुरी आता प्रेक्षकांना निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे.ती १५ ऑगस्ट या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून हा एक कॉमेडी चित्रपट आहे.