Join us

मंजिरी-प्रियदर्शनची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 11:46 IST

Exculsive - बेनझीर जमादारबॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मंजिरी फडणीस आणि टाईमपास 2 या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता प्रियदर्शन ...

Exculsive - बेनझीर जमादारबॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मंजिरी फडणीस आणि टाईमपास 2 या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता प्रियदर्शन जाधव यांची जोडी लवकरच एका मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातील मंजिरीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. मंजिरीने या चित्रपटानंतर अनेक तमीळ चित्रपटांमध्येही काम केले. तसेच मंजिरीने एका मराठी चित्रपटातही काम केले होते. तिच्या या नव्या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना मंजिरी फडणीस म्हणाली, 'माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे मराठीत काम करण्याची माझी कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुळे या चित्रपटात काम करायला मला खूप मजा आली. मी आणि प्रियदर्शन जाधवने चित्रीकरणाच्यावेळी खूप धमालमस्ती केली. या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण शिल्लक असून ते लवकरच पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.' हा चित्रपट तेजस धनराज यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही महिने असल्याने प्रियदर्शन आणि मंजिरी यांची हटके जोडी पाहायला मिळणार आहे.