Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन हे उत्तर नाहीये असे ट्वीट करणारे महेश कोठारे सोशल मीडियावर झाले ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 14:43 IST

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी एक ट्वीट केले असून यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

ठळक मुद्देमहेश कोठारे यांनी ट्वीट केले आहे की, लॉकडाऊन हे उत्तर नाहीये.... 

देशभर कोरोनाचा प्रार्दुभाव प्रचंड वाढला असून रुग्णांची संख्या प्रचंड आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरानामुळे दगावणाऱ्यां लोकांची संख्या देखील वाढली आहे. ही सगळी परिस्थिती पाहाता अनेक राज्यात रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती असून लवकरच संपूर्ण लॉकडाऊन केला जाईल असे म्हटले जात आहे. लॉकडाऊन करावा की नाही याबाबत सगळ्यांची वेगवेगळी मतं आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी एक ट्वीट केले असून यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. महेश कोठारे यांनी ट्वीट केले आहे की, लॉकडाऊन हे उत्तर नाहीये.... 

महेश कोठारे यांच्या या ट्वीटला सोशल मीडियावर अनेकांनी रिप्लाय केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, यांना कोरोना झाला तर सर्व सोयी सुविधा मिळणार म्हणून बोलायला सूचतयं. थाळी वाजवा तेवढच जमणार तुम्हाला.

तर एका युझरने गेल्या लॉकडाऊनमध्ये हा प्रश्न का नाही विचारला असे म्हटले आहे. अजून एक सेलिब्रेटी भक्त सापडला मागच्या वर्षी झोपलेलात का आपण? त्या वेळी का नाही आठवले एवढे थोर विचार? Lockdown उत्तर नाही तर दुसरे उपाय काय आहे ते ही सांगाल का जनतेला? नुसते आग लावायची कामं आहेत ही. एवढी चांगली जागा बनवली मराठी प्रेक्षकांच्या मनात का अश्या पोस्टने ते खराब करू इच्छिता आपण... असे म्हणत सोशल मीडियावर त्यांचा समाचार घेतला आहे.

तर तुमच्या घरात कोणी पॉझिटिव्ह निघाल्यास तुम्हाला खरी परिस्थिती कळेल असे म्हटले आहे. तसेच त्याचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे. या युझरने ट्वीट मध्ये म्हटले आहे की, तुमच्या घरात कोणी positive आला तर कळेल, lockdown पाहिजे की नाही... क्षमा असावी सर... माझी परिस्थिती पण हलाखीची आहे, रिक्षा आहे, कुठून हफ्ते फेडायचे, इलेक्ट्रॉनिक दुकान आहे, भाडे कसे द्यायचे, कूलर, पंखे याच दोन महिन्यात विकले जातात, पण वडीलpositive निघून खूप काही त्रास झाला... कोरोनाची एवढी झपाट्याने वाढ.... जीव वाचवणे हीच सध्या कमाई...

महेश कोठारे यांनी वृत्त वाहिनीवरील लॉकडाउन हवा की नको या विषयावरील एक व्हिडीओ शेअर करत माझ्यावर टीका करणाऱ्य़ांसाठी उत्तर अशी प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे दिली आहे. 

टॅग्स :महेश कोठारे