Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीच्या मुकुटात मानाचा तुरा; पोस्ट करत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 6:42 PM

 नुकतचं तिला एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आता 'फुलराणी' म्हणून प्रसिद्ध झाली आहे. प्रियदर्शनीने चित्रपट, वेब सीरिज आणि मालिका अशा सगळ्याच अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी सोडली नाही. विविधांगी भूमिका साकारून तिने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते.  नुकतचं तिला एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

प्रियदर्शनीने इंदलकरला यंदाच्या सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. ती म्हणाली, 'व्हयं, मी सवित्रीची लेक! ३ जानेवारी ला, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त, ज्ञान Foundation कडून मला “सावित्रीची लेक २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सोनाली कुलकर्णीच्या पोस्ट वरुन प्रेरणा घेऊन, हा पुरस्कार स्विकारताना, मी सावित्रीबाईंची चिरी लावून गेले आणि ताईने लिहीलेल्या ओळी देखील मनोगतात व्यक्त केल्या'.

 'स्वतःला “सावित्रीची लेक“ म्हणवुन घेताना ही चिरी माझ्यातल्या स्वाभिमानाला आणखीन प्रोत्साहन देत होती. श्रीपाल सबनीस, मनोहर कोलते यांचे मनापासून आभार. हास्यजत्रेमुळे मी घराघरात पोहोचते आहे, आणि हास्यजत्रेच्या पुण्याईमुळे असे पुरस्कार माझ्या पदरी पडत आहेत', असेही ती म्हणाली. यासोबतच तिने कार्यक्रमातील काही फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले. 

 मुळची पुण्याची असलेल्या  प्रियदर्शनीने ‘ई टीव्ही मराठी’ या वाहिनीवरील ‘अफलातून लिटील मास्टर्स’ या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. प्रियदर्शिनी 'फुलराणी' या मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. ती शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजमध्ये झळकली होती. 'फुलराणी' या चित्रपटातही प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत होती.  मात्र नुकतंच तिने तिच्या आयुष्यातील एक स्वप्न अपूर्ण राहिल्याबद्दलची खंत व्यक्त केली.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताटिव्ही कलाकार