प्रेमात पडायचयं...मग पहा ‘मोहरले हे...’ हे गाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 20:18 IST
प्रेम ही अशी सुखद भावना आहे की, आयुष्यात एकदातरी ती आपल्या मनात उमलते.
प्रेमात पडायचयं...मग पहा ‘मोहरले हे...’ हे गाणं
प्रेम ही अशी सुखद भावना आहे की, आयुष्यात एकदातरी ती आपल्या मनात उमलते. आणि या भावनेत जगायला प्रत्येकालाच आवडते. मात्र हा सुखद अनुभव प्रत्येकाच्याच वाट्याला येतोच असे नाही. ज्यांनाही या भावनेत जगण्याची इच्छा असेल आणि प्रेमात पडायचं असेल त्यांनी मात्र अभिनेता प्रथमेश परबच्या आगामी ३५% टक्के काठावर पास ह्या सिनेमातील ‘मोहरले हे...’ हे गाणं नक्की पहा. हे गाणं पाहून तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल. आदर्श शिंदे आणि सायली पंकज ह्यांच्या सुमधूर आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेले हे गाणं प्रथमेश परब आणि नवोदित अभिनेत्री आयली घिया यांच्यावर ब्युटीफुल अशा इंटरनॅशनल लोके शनवर सुट करण्यात आले आहे.‘३५% काठावर पास’ यामध्ये एक नव्या धाटकीची भूमिका साकारताना प्रथमेश दिसेल. सेजल शिंदे फिल्म्स, ५२ फ्रायडे आणि ड्रिमसेलर एन्टरटेन्मेंट सिनेमाज हे सादरकर्ते असलेल्या ह्या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन सतीश मोतलिंग यांचे आहे. प्रियतमा या मराठी सिनेमानंतर मोतलिंग या नव्या जॉनरचा विषय हाताळताना दिसतील. प्रथमेश या चित्रपटाच्या माध्यमातून पून्हा एकदा विनोदांची जोरदार फटकेबाजी क रण्यास सज्ज झाला आहे.