Join us

हे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत भाऊ, केले आहे एकत्र काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 07:00 IST

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल केला.

रसिकांना त्याने खळखळून हसवलं, रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा, त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्षः वेड लावलं. केवळ कॉमेडीच नाही तर कोणत्याही भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे साऱ्यांचा लाडका 'लक्ष्या'.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या हिंदीतील भूमिका देखील प्रचंड गाजल्या. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. लक्ष्मीकांत आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांना आजही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.

लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या चुलत बंधूने मिळून नाटकांमध्ये काम केले होते. टूरटूर या गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शक त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे होते. टुरटुर या पुरुषोत्तम बेर्डेंच्या प्रचंड गाजलेल्या नाटकाचा जन्मच त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये झाला होता. या नाटकामुळे लक्ष्मीकांत यांना खरी ओळख मिळाली.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे